मक़सूद अली,जिल्हा प्रतिनिधि
यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागच्या शहर उपाध्यक्ष पदी मोहम्मद वसीम (नवाब) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उच्च आदर्शानुसार काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू राहावी तसेच राहुल गांधी यांच्या दृष्टीकोणातून समाजाच्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत काँग्रेस पोहचावा या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस पक्षाची प्रतिमा जनमाणसात उज्वल करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त उपाध्यक्ष मोहम्मद वसीम नवाब यांनी यावेळी व्यक्त केला. नियुक्तीचे पत्र जिल्का काँग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागचे अध्यक्ष जफर एन.खान यांनी मो.वसीम यांना दिले. त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे. नियुक्तीचे श्रेय ते काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारींना देतात.