निळोणा धरणातून शहरास पाणी पुरवठा सुरु


यवतमाळ, दि. 14 : यवतमाळ शहरास पाणी पुरवठा करण्याकरीता वापरण्यात येणारे जलस्त्रोतांपैकी निळोणा धरणात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पर्जन्यमानामुळे काही प्रमाणात जलसाठा उपलब्ध झालेला आहे. त्या जलसाठ्यात एमरजेन्सी पंप बसवून त्याद्वारे दिनांक 14 जून पासून निळोणा धरणावरून होणाऱ्या भागात  पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. सदर पाणी पुरवठा हा आधीच्याच नियोजनाप्रमाणे करण्यात येईल.

त्याचप्रमाणे यवतमाळ शहरातील चापडोह धरणातून पाणी पुरवठा होणाऱ्या भागास निळोणा धरणातूनच पाणी पुरवठा करण्याकरीता फ्लोटींग पंप तसेच निळोणा व चापडोह पाईपलाईन क्रॉस कनेक्शन करून पाणी पुरवठा करण्याकरीता आवश्यक व्यवस्थेचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. सदर काम येत्या 8 दिवसात पूर्ण करून आधीच्या नियोजनाप्रमाणेच संबंधीत भागात पाणी पुरवठा करण्यात येईल. धरणातील पाणी उपलब्धतेनुसार यवतमाळ शहरातील पाणी पुरवठा कालावधी ठरवण्यात येईल याची सर्व यवतमाळकरांनी नोंद घेऊन सहकार्य करावे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post