इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील जेवळी येथील गुरू सिद्धेश्वर विरक्त मठाचे मठादिपती मनिप्र गंगाधर महास्वामी यांचे अधिक मास निमित्ताने तेलंगणा राज्यातील श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे एकवीस दिवसाच्या सातव्या मौन व्रत अनुष्ठान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
धर्मसभेने या अनुष्ठानाची समाप्ती करण्यात आली.
भारतात असलेल्या बारा ज्योतिर्लिग पैकी एक स्थान तेलंगणा राज्यातील श्रीक्षेत्र श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे आहे. अधिकमास निमित्त जेवळी येथील गुरू सिद्धेश्वर विरक्त मठाचे मठादिपती मनिप्र गंगाधर महास्वामी यांच्या एकवीस दिवसाच्या सातव्या मौनव्रत तपोअनुष्ठानास मंगळवार दि.22 रोजी प्रारंभ झाला होता.या मौनव्रत अनुष्ठान समाप्ती सोहळा निमित्ताने सोमवार दि.11रोजी धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते.या धर्मसभेसाठी श्रीशैल येथीलअवधूत गिरी महाराज,षब्र सिद्धेश्वर शिवाचार्य लोहारा,षब्र शिवयोगी शिवाचार्य अणदूर, षब्र धनलिंग रूद्रमणी शिवाचार्य राजेश्वर,षब्र दिगंबर शिवाचार्य वसमत,षब्र शिवमूर्ती शिवाचार्य अचलेर, षब्र महादेव शिवाचार्य वाई, षब्र गंगाधर शिवाचार्य बार्शी,षब्र पंडीताराद्या शिवाचार्य हळ्ळी खेड, षब्र चन्नमल देवरू हुडगी या मठाचे मठाधिपती यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित महास्वामीनी भाविकांना आशिर्वचन करताना म्हणाले की मनिप्र गंगाधर महास्वामी यांनी अखंड मानव जाती व विश्वकल्याण हेतू तसेच धर्माचे रक्षण व्हावे यासाठी एकवीस दिवसाच्या मौनव्रत अनुष्ठान केले.यापूर्वी त्यांनी सहा वेळा मौनव्रत अनुष्ठान केले आहे.त्यामुळे उपस्थित सर्व संत महंताच्या हस्ते गंगाधर महास्वामी यांचा सत्कार करून मौनव्रत अनुष्ठान समाप्ती करण्यात आली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उमरग्याचे आ.ज्ञानराज चौगुले,लातूरचे नगरसेवक चंद्रकांत बिराजदार,अनंत गायकवाड,शिवसेनेचे लोहारा तालुका प्रमुख मोहन पणुरे मुरूम बाजार समितीचे उपसभापती बसवराज कारभारी,उपसरपंच मल्लिनाथ डिग्गे,हभप कमलाकर कोळी, हभप हरी गाडेकर, बांधकाम अभियंता राजेंद्र माळी,शिवकांत पाटील, दौलप्पा तोरकडे, दयानंद चवले यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मौनव्रत अनुष्ठान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनुष्ठान समितीच्या वतीने परिश्रम घेण्यात आले.