- तेल्हाऱ्यात सर्वपक्षीय नेत्यांची भाऊसाहेबांना श्रद्धांजली
तेल्हारा :- बारा बलुतेदारांसह अठरापगड जातींना सोबत घेऊन शहरी भागा पुरता मर्यादित असलेला पक्ष ग्रामीण भागात नेऊन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचे काम बहुजनांचे कैवारी शेतकरी नेते कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकरांनी केले त्यांच्या अकाली निधनामुळे समाजाची व पक्षाची फार मोठी हानी झाली आहे
,प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता पोरका झाला आहे सामान्यांशी नाळ जुळलेला निष्ठावंत नेता म्हणून भाऊसाहेबांची उणीव कायम भासत राहील अशा शब्दात सर्वपक्षीय नेत्यांनी सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शोकसंवेदना व्यक्त करून भाऊसाहेबांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली .
तेल्हारा येथील टॉवर चौका मध्ये 3जूनला सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या भाऊसाहेबांनी जनसंघ ते भाजपाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले 40 ते 45 वर्ष संघटना व पक्ष निष्ठतेची वाट ते अविरत चालत राहिले भाजपाला बहुजन चेहरा देण्यात भाऊसाहेबांचा मोठा वाटा आहे अकोला जिल्ह्यला कर्मभूमी मानणाऱ्या राज्याचे लोकनेते कृषिमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांनी अकोला लोकसभा मतदार संघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष ,विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते कृषिमंत्री भाजपा चे प्रदेश अध्यक्ष असे विविध पदे सांभाळत असतांना भाऊसाहेबा कार्यकर्त्यांपासून दूर गेलेले कधी दिसून आले नाही
त्यांनी कार्यकर्त्यांना घडविले मोठे केले भाऊसाहेब मंत्री झाले म्हणून त्यांनी आपला मोबाईल नंबर बदलविला नाही तळागाळातील कार्यकर्त्यांचा आलेला फोन स्वतः उचलून त्याचे समाधान व प्रश्न मार्गी लावण्याचे काम भाऊसाहेबांनी केले याचे अनेक उदाहरणे देता येतील त्याच्या अकाली निधनामुळे राजकारणात व समाजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे
तसेच समाजाची व पक्षाची फार मोठी हानी झाली अशा शब्दात शोकसंवेदना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वासुदेराव नळकांडे आमदार प्रकाश भारसाकाळे भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे नगराध्यक्षा जयश्रीताई पुंडकर शेतकरी सहकार प्यानलचे राजेश खारोडे माजी नगराध्यक्ष दयालसिह बलोदे पत्रकार संघाचे सदानंद खारोडे प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष विक्की मल्ल शिवसेनेचे प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव युवा क्रांती विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा.प्रदीप ढोले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नारायणराव ठोकने राष्ट्रीय कांग्रेस कमिटीचे डॉ. संजीवनी ताई बिहाडे प्रशांत देशमुख डॉ.अशोक बिहाडे ,भाजपा महिला आघाडीच्या नयनाताई मनतकार, स्मिताताई राजनकर , प्रतिभाताई बरींगे, कमलताई कमलताई चंदन
कुणबी युवक संघटनेचे संदीप खारोडे युवासेना शहर प्रमुख सचिन थाटे बार असोसिएशनचे गजानन तराळे शिक्षक संघटनेचे शिवराज जामोदे युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष भवानी प्रताप लोकजागरमंचचे चंद्रकांत मोरे इत्यादी विविध राजकीय पक्षाचे व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भाऊसाहेबांना
भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली तसेच उपस्थित नागरिकांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली श्रद्धांजली सभेला माजी पंचायत समिती सभापती गजानन नळकांडे खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष सुदेश शेळके भाजप शहर अध्यक्ष ओम सुईवाल प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक राजेश खारोडे युवा मोर्च्यांचे लखन राजनकर सतीश जयस्वाल अक्षय पद वाड राहुल झापर्डे शिवसेना शहर प्रमुख विक्रांत शिंदे पप्पूभाऊ सोनटक्के भारिप बमसचे अशोक दारोकर ,विकास पवार राजेश टोहरे नगरसेवक गोवर्धन पोहरकार कैलास ठोकने
नरेश आप्पा गंभीरे सुनील राठोड मंगेश सोळंके संदीप सोळंके माजी नगरसेवक शंकरराव देशमुख नथुभाऊ शेळके गजानन गायकवाड एकनाथ ताथोड अनील पोहणे दीपक पोहणे संतोष राठी अनंत सोनमाळे युवा सेना तालुका प्रमुख जयंत चिकटे आशिष शेळके नितीन मानकर विठ्ठल मामनकार आकाश फाटकर शांतीलाल शर्मा श्याम जोशी शांतीलाल शर्मा प्रेम तायडे इत्यादी सर्वपक्षीय नेते पदाधिकारी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्र संचालन किशोर भागवत यांनी केले
