शेतकरी संघटना च्या दिवठाना येथील सभेत शेतकरयानी दिली भाऊसाहेब फूडकर यांना श्रद्धांजलि !


शेतकरी संघटना ची गावागावत पोपटखेड धरणातील पानी पाइपलाइन ने वितरित करण्यात यावे या करिता गावागावत जावून शेतकरयांची सभा घेवून जनजागृति मोहिम सुरु आहे .या सभे मधे स्थानिक शेतकरी आपले प्रश्न माडून त्यावर विशेष चर्चा घडत आहे .अचानक आलेल्या बातमि मधे राज्याचे कृषि मंत्री भाऊसाहेब फूडकर यांच्या जान्याने सभेत शोकांतिका पसरली होती .या सभेमधे शेतकरी संघाटना चे राष्ट्रीय प्रवक्ते ललित दादा बहाळे यानी भाऊसाहेब सोबतिला जुन्या आठवणी ना उजाड़ा दिला .आपल्या भागातील राज्यमंत्री असल्यामुळे त्यांना शेतकरी आणि शासन यातिल वादविवाद मधे भाऊसाहेब मध्यस्ति ची भूमिका घेत होते .शेती क्षेत्राला तंत्रधान स्वतंत्र देण्याकरिता विशेष पावले मि उचलनार अस आश्वासन त्यांनी दिले होते आणि त्यांनी त्यांची सुरवात केली होती पन त्यांच्या जान्याने ति सुरवात पुन्हा करावी लागेल .शासन आणि शेतक़री यातिल मध्यस्ति ठेवनारा नेता हारपला अस मत त्यांनी वक्त केले .शेतकरी संघाटना चे माजी जिल्हा प्रमुख शातिष देशमुख यांनी तंत्रधान स्वतंत्र च्या लढाईत शासन दरबारी पाठपुरावा करणारे नेते गेल्यामुळे यात काही काल का असोना पन खंड पडला अस मत वक्त केले .शेतकरी संघटना चे तेल्हारा तालुका प्रमुख2लक्ष्मीकांत कौठकर यांनी राज्यमंत्री भाऊसाहेब फूडकर गेल्याने शेतकरयांचे प्रश्न ऐकून घेणारे नेते आज आपल्यामधुन निघुन गेले ही पोकडी भरून न निघनारी आहे .तेल्हारा येथील कृषि महोत्सव मधे मि भाऊसाहेब यांना अकोट यार्ड मधील शेतकऱ्यांच्या उडिद च्या ट्राली शासन ने खरेदी करावे अस त्यांना निवेदन दिले होते .त्यावर त्यांनी आश्वासन देवून संध्याकाल पर्यन्त अधिकारी ला इ मेल दयारे आदेश दिले होते तसेच अकोला येथे मोटरसायकल रैली ने जावून शेतकरी संघटना च्या कार्यकर्त्यांनि भाऊसाहेब यांना अकोला जिल्ह्यातील बोड अळी च्या निधि मधून 31 मंडल अकोला जिल्हातून वघडली होती ति समाविष्ट करावी अशी विनती केली होती त्यावर त्यांनी शब्द देत मुख्यमंत्री सोबत चर्चा करुण प्रकरण निकाली काढनार अस आश्वासन दिले.आणि शब्दाला लक्ष देवून बोड अळी च्या मदत निधिमधे वघळलेले मंडल समाविष्ट करुण घेतले .असा शेतकऱ्यांच्या समस्या भेटन्यास आणि ऐकून घेणारे नेते भाऊसाहेब काळाआड झाला ही दुःखद बाब आहे .शेतकरी संघटना गाव प्रमुख चंद्रशेखर वलसिंगे आणि उपप्रमुख विष्णु वलसिंगे यांची सर्व सम्मतिने निवड करण्यात आली. सभेला दिनेश देवूलकार ,प्रमोद वलसिंगे, दिनेश गिरे, भीमराव वलसिंगे, अशोक शेंडे, विष्णु वलसिंगे, चंद्रशेखर वलसिंगे,एकनाथ शेंडे, बापूराव वलसिंगे, पुंडलिक वलसिंगे, विजय वलसिंगे, गंगाधर वलसिंगे, राजेंद्र सिरसाट, गजानन शेंडे, सचिन वलसिंगे,व समस्त शेतक़री उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post