जेवळी येथे अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथ पारायण संपन्न


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-लोहारा तालुक्यातील जेवळी येथील सरस्वती मंदिरात अधिक मासानिमित्त विश्वशांती अखंड शिवनाम सप्ताह व परमरस्य ग्रंथाच्या पारायण उत्साहत पार पडले.बाबुराव भुजबळ महाराज (वाडी वडगाव) यांच्या काल्याच्या किर्तनाने या शिवनाम सप्ताहचा सांगता करण्यात आला.या सात दिवसाच्या काळात येथे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.
  या काळात येथील सरस्वती मंदिरात दरोज पाहाटे पाच ते सहा शिवपाठ,सकाळी सात ते आठ सरस्वतीच्या मूर्तिला महाभिषेक,आठ ते बारा श्री परमरस्य ग्रंथाचे पारायण,दुपारी दोन ते चार गाथाभजन, सायंकाळी चार ते पाच प्रवचन,पाच ते सहा नामजप,सहा ते सात शिवपाठ,सात ते रात्री नऊ भोजन,नऊ ते बारा शिवकिर्तन तर एक ते पहाटे चार शिवजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडल्या आहेत.या शिवनाम सप्ताहत दरोज सायंकाळी चार ते पाच प्रवचन तर रात्री नऊ ते बारा शिवकिर्तन पार पडत आहे.यात प्रवचन हे रामचंद्र ढोबळे गुरुजी (जेवळी),अण्णाराव बिराजदार महराज (हिप्परगा सय्यद), काका महाराज (भुयार चिंचोली), बाबुराव भुजबळ महाराज (वाडी वडगाव),आर व्ही पाटील गुरुजी (तडोळा) यांचे झाले तर  सौ शिलाताई मालोद (तोंडार), उध्दव हैबतपुरे महाराज (उदगीर), सौ भाग्यश्री पाटील (दौड हिप्परगा),सोपान सोनटक्के महाराज (परभणी), कु. किर्तीताई सालगरे-स्वामी (उदगीर), संगिताताई मस्कले (मुखेड) याचे किर्तन झाले.बाबुराव भुजबळ (वाडी वडगाव) यांच्या काल्याच्या किर्तनाने या शिवनाम सप्ताहाचे सांगता झाला आहे. ह शिवनाम सप्ताह यशस्वीतेसाठी येथील गावकरी व सरस्वती शिव भजनी मंडळाने परिश्रम घेतले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post