शिवाजी महाराजांचे शक्तीपीठ जिजाऊ होत्या.... प्रा. बोचरे


जितेश कारीया
आई जिजाऊंच्या संस्कार आणि मार्गदर्शनामुळेच शिवाजी महाराज घडले त्यामुळे जिजाऊ या शिवाजी महाराजांच्या शक्तिपीठ, ज्ञानपीठ व विद्यापीठ होत्या असे प्रतिपादन शिवचरित्रकार प्रा.अनुप बोचरे यांनी केले.शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संत तुकाराम  महाराज प्रबोधन समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानात पुढे बोलतांना ते म्हणाले शिवाजी महाराजांना एकाच धर्मापुरते मर्यादित ठेवणे योग्य नाही .कार्यकर्माच्या अध्यक्षस्थानी सौ.शिलाताई धांडे होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच सौ.शिल्पाताई भोपळे ,ठाणेदार विकास देवरे,पोलीस पाटील प्रकाश गावंडे उपस्थित होते.या वेळी आदर्श विवाह केल्याबद्दल समितीचे रमेश दुतोंडे यांनी प्रत्येकी 1100 रु.च्या भेटवस्तू देऊन अमोल भटकर व श्रीकांत परनाटे यांचा सन्मान केला तर तेरवी सारख्या प्रथा बंद केल्याबद्दल समितीच्या वतीने गोपाल घुंगड व सुदेश इंगळे यांना गौरविण्यात आले.प्रस्ताविकातून महेंद्र कराळे यांनी समितीच्या उपक्रमाची माहिती दिली.यावेळी प.स.सदस्य मनिष भांबुरकर, ग्रा.प.सदस्य सुरेश ओंकारे,अजीज खा,तंटामुक्ती अध्यक्ष नंदलाल चौबे,मिलिंदकुमार भोपळे,प्रकाश खोब्रागडे, सुनील इंगळे,पुरुषोत्तम गावंडे,डॉ.प्रशांत इंगळे,किरणभाऊ राऊत,राजेश वानखडे यांच्यासोबत समितीचे सक्रिय कार्यकर्ते वासुदेव निंबोकार,माजी सरपंच संदिप इंगळे,अनिल कराळे ग्रा.प.सदस्य बजरंग तिडके,रामेश्वर शिंगणे,मनीष बहाकर,संजय शेंडे यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश व्यवहारे,उमेश तिडके,गोपाल मोरोकार,गजानन राऊत,पंकज देशमुख, लक्ष्मण धांडे,उमेश कोल्हे,अशोक कोरडे,अशोक शेंडे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन सौ.प्रिती तिडके यांनी तर आभार प्रदर्शन राजेश टाले यांनी केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post