शाह-ठाकरे भेटीनंतर 'युती'बद्दल संजय राऊत यांची प्रतिक्रिया.


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली. अनेक गोष्टींवर या भेटी दरम्यान चर्चा झाली. या भेटीमुळे शिवसेना - भाजपा मधील दुरावा कमी होणार का? याकडे सार्यांचे लक्ष लागले होते.


  • संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया 


 2019 साठी युती होईलच, असं भाजप तर्फे सांगण्यात येत असलं तरी शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षाचे प्रमुख उद्धव यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा ठराव मंजुर केला आहे. तो अन्य कोणत्याही पक्षाला बदलता येणार नाही, असं शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे. स्वबळावर निवडणुका ठरवण्याच्या भूमिकेवर शिवसेना ठाम असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post