शेतकरी संघटना च्या सभेत वळगाव मेंढे येथील शेतकऱ्यांनी केला पाणी बचतीचा संकल्प


जाहिरात

सिरसोली प्रतिनिधी :-
वळगाव मेंढे : शेतकरी संघटना ची गावागावात जाऊन जण जागृती मोहीम सुरू आहे .ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेती क्षेत्रात भविष्यात येणाऱ्या अडचणी वर विचार मंथन सुरू आहे .वळगाव मेंढे येथील सभेत शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते ललित बहाळे यांना गावातील शेतकऱ्यांना पाणी विषयी मार्गदर्शन केले .पाणी हा भविष्यातील चिंतेचा विषय आहे. ही राष्ट्रीय संपत्ती चे जतन करणे हे देशातील प्रत्येक नागरिक चे कर्तव्य आहे .भविष्यात तिसरे महायुद्ध हे पाण्याकरिता होणार आहे अशे जागातीक चिन्ह दिसत असताना काही राजनैतिक लोक मात्र अट्टाहास पोटी समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. पोपटखेड धारण टप्पा - 2 मधील पाणी हे पाईपलाईन ने वितरित करण्यात यावे जेणे करून पाण्याचा वापर अधिक कार्यक्षमतेणे व्हावे .आज जर का या कडे लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिसत आहे .लवकरात लवकर या कडे शेतकऱ्यांनि लक्ष न दिल्यास याचे गंभीर परिणाम हे जनतेला भोगावे लागू शकतात .पाईपलाईन ने पाणी वितरित केल्यास मोठया प्रमाणावर बचत होऊ शकते ,अस मत त्यांनी सभेत मांडले .शेतकरी संघटना चे माजी जिल्हा प्रमुख सतीश बाबा देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या शोषणा संबंधित विषलेशन केले. सरकार कोणत्याही पक्षाची आली तरी शेतकाऱ्यांचेच शोषण करते अस मत या वेळी त्यांनी वक्त केले .शेतकरी संघटना चे तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर यांनी शासकीय खरेदी वर प्रकाश टाकत नाफेड च्या माध्यमातून होत असलेल्या खरेदी मधे शेतकऱ्यांचे हाल होत आहे .बारदाना नाही ,गोडावून नाही, लिंक नाही ह्या शासकीय खरेदीतील त्रुटी नसून हे शासकीय खरेदी चे वैशिष्ट्ये आहेत .आधी शासन मोठ्या प्रमाणावर शेती माल आयात करून भाव पाडते व भाव कमी झाले की हमी भाव म्हणून त्रास देऊन खरेदी करते. शासनाने शेती मालाच्या व्यापारात हस्तक्षेप बंद करावा व शेतकरयांना बाजारपेठ स्वतंत्रता द्यावी अस मत यावेळी वक्त केले .या सभेला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या सभेत अतुल मेंढे यांची शेतकरी संघटना प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच उप प्रमुख म्हणून भूषण मेंढे यांची निवड करण्यात आली .सभेचे आयोजन ज्ञानेश्वर मेंढे यांनी केले होते . या सभेला श्रीधर गावंडे,दिनेश देऊलकार,दिनेश गिर्हे,शेतकरी संघटना चे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच गावातील शेतकरी विशाल मेंढे, शाम मेंढे, अजय वैतकार, प्रभूदास मेंढे, शिवदास मेंढे, पवन मेंढे, संतोष मेंढे, ज्ञानेश्वर मेंढे,गोपाल मेंढे, समाधान मेंढे, संजय मेंढे ,एकनाथ मेंढे, शाम मेंढे, जयेश मेंढे, रमेश वाकोडे, विजय मेंढे, तुकाराम मेंढे, प्रवीण मेंढे, सुरेश मेंढे, गजानन मेंढे, प्रकाश मेंढे, गणेश मेंढे, विनोद मेंढे, देवानंद डोबाळे, तुलसीदास मेंढे नरेश खरात,व समस्त शेतकरी गावकरी उपस्थित होते.
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post