सामाजिक कार्यकर्ते विनोद दादा क्षीरसागर यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रम घेवुन साजरा

जाहिरात

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे तालुका सरचिटणीस युवा नेते विनोद (दादा) क्षीरसागर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेवुन उत्साहात साजरा करण्यात आला.यांच्या वाढदिवसानिमित्त सलग तिन दिवस विविध कार्यक्रम घेण्यात आले.

यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद येथील स्वआधार मतिमंद विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.व तसेच वृक्ष लागवड करण्यात आली.
केशेगाव येथील शिवाजी चौक येथील सांस्कृतीक सभागृहात आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर घेण्यात आले.या आरोग्य शिबीरात डॉ.जितेंद्र डोलारे व डॉ.नागुरे यांनी रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.या रक्तदान शिबीरातील रक्ताचे संकलन शासकीय रुग्णालय उस्मानाबाद यांनी केले.
जाहिरात


या शिबीरास नागरीकांनी व युवकांनी चांगला प्रतिसाद दिला.यानंतर केशेगाव येथील सांस्कृतीक सभागृहात  ग्रामस्थांच्यावतीने दि.27 मे रोजी सांयकाळी युवा नेते विनोद (दादा) क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रम घेण्यात आला.
जाहिरात

यावेळी केक कापुन व मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख म्हणुन भाजप जिल्हा उपाध्यक्ष रामदास कोळगे, भाजप उस्मानाबाद तालुका अध्यक्ष दत्ता सोनटक्के,युवा नेते अभिराम पाटील,जि.प.सदस्य ज्ञानदेव राजगुरु,पं.स.सदस्य संजय काका दळवे,पं.स.सदस्य महेश चांदणे,सरपंच काका शेळके(बामणी),सरपंच बाबासाहेब सुरवसे (केशेगाव),प्रा.सिध्दु गोपणे,भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,अदि उपस्थित होते.
जाहिरात

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार काळे,विपुल पवार,किशोर पाटील,शाम माळी,अमोल नवले,पांडु
 सुरवसे,अजिज शेख,संतोष माळी,राहुल माळी, विक्की चांदणे,संकेत सोनटक्के,बाळासाहेब मगर, अदिंनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष सोनटक्के यांनी केले तर आभार समाधान शिंदे यांनी मानले.या कार्यक्रमास गावातील व परिसरातील युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post