जाहिरात
अकोट व तेल्हारा तालुक्यातील सण २०१५ मधील शेतकऱ्यांना मिळणारे ५०% अनुदान हे तहसील मार्फत ठरलेल्या बँकेत पाठविण्यात आले.यात काही त्रुटी असतील तर तहसील कार्यालय व बँकेचे अधिकारी यांनी एकमेकांशी समन्वय साधून आतापर्यत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा व्हायला पाहिजे होते.परंतु आतापर्यंत ते जमा झाले नाही.यासंबंधी दोष कोणाचा ? शासनाच्या अधिकाऱ्यांचा की बँकेचा याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने अहवाल मागवावा.आज रोजी शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे.पेरणीचे दिवस जवळ आले आहेत शासन शेतकऱ्यांची मदत न करता चेष्टा करत आहे.याचा शिवसेना गटनेता तथा सभापती मनिष कराळे यांनी तीव्र शब्दात निषेध करत संबंधित अधिकाऱ्यांना इशारा दिला.जर शेतकऱ्यांना पेरणीच्या अगोदर शासनाची जी मदत घोषित झाली ती मिळाली नाही तर तसेच याप्रकरणात जे अधिकारी अकार्यक्षमता दाखवतील त्या अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसने मुश्किल करत सळो की पळो करून सोडू.यासंबधी शासनाचे अधिकाऱ्यांनी या इशाऱ्याची गंभीर दखल घेत शेतकऱ्यांना न्याय द्यावा