औरंगाबादमध्ये अनर्थ टळला; मोठा शस्त्रसाठा जप्त, तलवारी मागवल्या होत्या ऑनलाइन.

जाहिरात

औरंगाबाद :-  ऑनलाईन मागवण्यात आलेल्या तलवारी आणि चाकू पोलिसांनी कुरिअर कंपनीतून जप्त केल्या आहेत. नागेश्वरवाडीत छापा मारुन पोलिसांनी 12 तलवारी, 13 चाकू ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी कुरिअर कंपनीच्या व्यवस्थापकाला अटक केली आहे.
जाहिरात

औरंगाबाद शहरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही लोकांनी ही शस्त्रं मागवल्याची माहिती समोर आलीय. पोलिसांनी या कारवाईत तलवारी, चाकू, कुकरी, गुप्ती अशीशस्त्रं जप्त केली.

गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांच्या पथकानं ही कारवाई केलीय. कुरिअर कंपनीच्या व्यवस्थापकाला अटक केल्यानंतर पोलिसांनी शस्त्रं मागवणाऱ्यांचा शोध सुरू केलाय.
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post