मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून लोणी गट ग्रामपंचायतिच्या अंतर्गत तीन गावांची आदर्श गावाकडे वाटचाल




  • मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून लोणी गट ग्रामपंचायतीची आदर्श गावासाठी  अंतर्गत निवड करण्यात आली.

मक़सूद अली
यवतमाळ , दि. ०२ :-  लोणी या गावाकरिता ग्रामपरिवर्तक रामेश्वर कारभारी बरबडे यांच्या प्रयत्नातून शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरू आहे. या कामाकरिता मागील 11 महिन्याच्या कालावधीमध्ये शासनाच्या , कॉर्पोरेट पार्टनर व जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनातून गावाच्या विकासाकरिता विविध योजनांच्या अंतर्गत %485000 रुपये इतक्या मोठ्या प्रमाणावर निधीची कामे पूर्ण झाली. या मिळालेल्या निधीतून गावातील लोकांच्या मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या. ज्या मध्ये घरकुल ,शौचालय,शेततळे ,गावातील रस्ते ,जनावरांसाठी हौद,वृक्ष लागवड,इ सुविधांसाठी सदरील निधी खर्च झाला आणि पहिल्यांदा गावासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामे झाली. मागील एक वर्षांपासून  गावातील लोकांच्या मानसिकतेत विविध जागृतीच्या माध्यमातून बदल करून लोकसहभागाच्या साह्याने गावामध्ये स्वच्छ भारत अंतर्गत 140 शौचालय आणि नरेगा अंतर्गत 35 शौचालय बनवून गाव हागणदारीमुक्त केले.
गावातील महत्वाच्या कामांकरिता मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान च्या माध्यमातून लोणी गट ग्रामपंचायत करीता 8 लक्ष 30 हजार एवढा निधी विविध कामांकरिता उपयोगात आणला गेला. गावामध्ये डिजिटल शाळा, शाळेला बोलकी करणे,गावातील जनतेसाठी पिण्याच्या पाण्याचीसोय करणे,शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करणे ,अंगणवाडी साहित्य, अंगणवाडी डिजिटल करणे,अंगणवाडी करिता पिण्याच्या पाण्याचे फिल्टर ,महिलांसाठी धोबीघाट,नवीन हातपंप,तीन गावांमध्ये वाचनालय, शेतकरी सहायता केंद्र, इ कामे गावामध्ये पूर्ण झाली असून. तसेच लोकसहभाग घेऊन गावातील स्वच्छता मोहिमेच्या मध्येमातून गाव आदर्श बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 शेतकरी सुविधा केंद्राच्या मध्येमातून गावामध्ये नाविन्यपूर्ण पूर्ण उपक्रम घेतले जात आहेत.


 ज्यामध्ये शेतकर्‍यांसाठी समुपदेशन , फळबाग लागवड प्रशिक्षण, शेतकरी अभ्यास दौरा महात्मा फुले कृषी विद्यापीठात नेऊन शेतकर्‍यांना शेळीपालन,दूध उत्पादन,फळबाग लागवड इ मध्येमातून शेतीशी पूरक व्यवसायामध्ये वळण्यासाठी मार्गदर्शन केले. त्याचा परिणाम शेतकर्‍यांवर सकारात्मक जावनला शेतकर्‍यांनी स्वतः फळबाग लागवड, आजोला शेड निर्मिती , जैविक शेती, रेशीम शेती करण्याकडे शेतकर्‍यांचा कल जाणवला.
शेतकर्‍यांसाठी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन शेतीसाठी ठिबक,तुषार,मागेल त्याला शेततळे च्या मध्येमातून शेतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामपरिवर्तक यांनी प्रयत्न केले. आज घडीला 5 शेततळे पूर्ण झाली असून इतर 10 शेततळ्याचे काम सुरू आहे. तसेच बांधबंधीस्ती आणि नाला खोलीकरण चे काम प्रगती पथावर आहे. गाव पाणीदार होण्यासाठो कामांची त्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे.
 वाचनालयाच्या मध्येमातून तरुणांची रोजगार निर्मिती कडे वाटचाल....

वाचनायची साथ भेटल्याने गावातील तरूणांना रर्वीलरींळेप रुरीपशी प्रोग्रॅम घेऊन पुसद मधील ळिी अधिकारी बन्सल साहेबांनी मार्गदर्शन करून मुलांना प्रेरणा दिली. त्यामुळे गावातील 23 तरुण यांनी बँकिंग अँड अकाउंटिंग चा कोर्स करत असून त्यातील 2 मुलांना नोकरी मिळाली ,तसेच पाळोदी गावातील एका मुलाचा 14 वर्षाचा हार्डवेअर चा अनुभव ग्रामपरिवर्तक यांच्या लक्षात आल्याने त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने व येतर सहकार्य करून स्वतःचे हार्डवेअर टाकण्यासाठी मदत केली, आज स्वतःचा व्यवसाय चांगला सुरू आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post