कुरूम : नजीकच्या मधापुरी येथे आज गुरूवार दि.३ मे ला दुपारी ३:०० वाजताच्या सुमाऱ्यास माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल ठाकरे यांच्या घरासमोरील असलेल्या घराला अचानक आग लागल्याने घरातील साहित्य,टिनपत्रे,लाकडी बंल्ली जळून खाक झाल्याने एकुण ३५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली.
मधापुरी येथिल रहिवासी निलेश सुधाकर राणे यांच्या घराला आज दुपारी ३ वाजता सुमाऱ्यास अचानक आग लागली. यावेळी मधापुरी येथे ढगाळ वातावरण व हवेचा जोर असल्याने आग चांगलीच पसरली.यादरम्यान घरात असलेले टिव्ही,दिवाण,चायणा फवारा पंप,२ सायकल,१५ लाकडी बंल्ली आदी साहित्य जळुन खाक झाले.
यावेळी शेजारच्यांनी प्रसंगावधान राखुन क्षणाचा विलंब न करता शेजारी असलेल्या तिन ते चार बोअरचे पाणी आणुन आग पुर्णता आटोक्यात आणली.
यावेळी तलाठी एस.व्ही.पाटिल,जेठापुर पोलीस पाटिल कोकीळा वाढे यांनी येवुन पंचनामा केला .याप्रसंगी सरपंच प्रदिप ठाकरे,ग्रा.पं.सदस्य दिपक चर्जन,कर्मचारी संजय नाईक,गावकरी विनोद ठाकरे,देविदास गांजरे उपस्थित होते.