मकसूद अली
यवतमाळ जिल्ह्यातील खासगी शाळांनी भरमसाठ फी वाढ केल्याने पालक चांगलेच संतापले आहेत.स्कुल ऑफ स्कॉलरच्या पालकांनी पालक संघाच्या बैठकीत विरोध केल्यानंतरही या वर्षीही प्रवेश शुल्कात १५ टक्के तसेच स्कुल बसच्या शुल्कातही वाढ केल्याने पालकवर्ग रस्त्यावर उतरला आहे.MIDC एरीयेत प्रदुषण पसरविणाऱ्या कारखाण्यांच्या विळख्यात असलेल्या स्कुल ऑफ स्कॉलर्स या खाजगी शाळेत मनमनीपणे यंदाही फीवाढ झाल्याने पालकांनी प्रमुख मागण्यांचे निवेदन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठविला आहे.
एकीकडे शुल्क नियंत्रण समिती कार्यान्वित करून,पालकांच्या तक्रारीची दखल घेऊन खासगी शाळांवर कायद्याने कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती विधानसभेत शिक्षण मंत्र्यांनी दिलेली असतांना देखील
स्कुल ऑफ स्कॉलर्स या संस्थेच्या पदाधिकारयांनी याला न जुमानता पालकांच्या मागणीला कानाडोळा केल्याने येथील पालकांनी फी वाढीविरोधात काळया फिती लावून मूक निषेध मोर्चा काढुन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार,शाळेचे मुख्याध्यापक,जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यात मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे शाळेची इमारत MIDC Area मध्ये असु नये, शाळेतील विद्यार्थ्यांची सर्व फी मिळून वीस हजार पेक्षा जास्त असु नये,शाळेची फि वाढ दरवर्षी न करता 5 वर्षांनी करावी व त्याकरिता पालकांची सहमती घ्यावी, बस ची वार्षिक फी 19,000 रु आहे ती अत्यंत अवास्तव आहे ती कमी करण्यात यावी, शाळेमध्ये CBSE syllabus पुर्णपणे राबविण्यात यावा अश्या अनेक मागण्या असलेले निवेदन देण्यात आले.