आजपासून यवतमाळात समता पर्व



 यवतमाळ :- सामाजिक क्रांतीचे अग्रदुत म.ज्योतीराव फुले व क्रांतीसुर्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व समाज घटकात समताधिष्ठीत मुल्ये रूजावीत आाणि भारतीयत्वाची भावना वृध्दींगत व्हावी या उदात्त हेतूने समता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.
10 एप्रील 2018 ला युवकांचे मनोबल वाढविण्यासाठी व त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी यवतमाळ ऑयडालचे उदघाटन झी मराठी सारेगमपचे उपविजेते उज्वल गजभार यांचे हस्ते होणार असून प्रा.अतुलशिरे, परवेज शहा यांची उपस्थिती राहील. समता पर्वाचे उदघाटकीय सत्र सायंकाळी 8 वाजता संपन्न होणार असून उदघाटक म्हणून प्रो.डॉ.गोपाल गुरू, जे.एन.यु.अधिव्याख्याता दिल्ली करतील. अध्यक्ष म्हणून डॉ.हर्षदिप कांबळे राहणार आहे. यावेळी म.फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर समतारत्न पुरस्का प्रा.क्डॉ.गोपाल गुरू यांना प्रदान करण्यात येणार आहे. याचबरोबर समता पर्व प्रेरणा पुरस्कार अशोक वानखडे, माजी अध्यक्ष समता पर्व 2016 यांना प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरला दिलेल्या 14 ऑक्टोंबर 1956 च्या दिक्षांत समारंभाचे साक्षीदार वसंतराव गेडाम उमरठा यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून जि.प.अध्यक्ष माधुरी आडे, जि.प. सीओ जलज शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, चेतन शिंदे, सिध्दार्थ भवरे, दिपक नगराळे, डॉ.दिलीप महाले, डॉ.दिलीप घावडे, अनिल आडे, राजुदास जाधव, मन्सुर एजाज जोश, घनश्याम नगराळे आदि उपस्थित राहतील.
11 एप्रील ला सकाळी 7 वाजता म.फुले यांना अभिवादन करण्यात येणार असून सायंकाळी 6 वाजता यवमाळ ऑयडालची अंतिम फेरी होणार आहे. सायंकाळी 8 वाजता प्रसिध्द लेखक सतनाम सिंघ यांचे फुले आंबेडकरी समाज आंदोलन का स्वरूप और समाज की भागीदारी या प्रश्नावर व्याख्यान होणार आहे.12 एप्रील गुरूवारला दुपारी 2 ते 4 दम्यान उद्योजक मार्गदर्शन व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, जवाहरलाल दर्डा श्रोतृग्रृह, शासकीय रूग्णालय येथे आयोजित केले असून उदघाटक माधुरी आडे, अध्यक्ष नरेंद्र फुलझेले, मार्गदर्शक एस.आर.लोंढे, एस.स.मुद्दमवार व अमोल पवार आणि राजेंद्र सुर्यवंशी, प्रोग्रामिंग आफीसर वर्ल्ड व्हीजन हे राहतील. दुपारी 4 वाजता समता कवी संमेलन आयोजन करण्यात आले. या संमेलनाचे अध्यक्ष भारत लढे हे राहणार आहे. सायंकाळी 6 वाजता प्रोफेसर डॉ.मुन्नी भारती, जे.एन.यु. दिल्ली यांचे फुले आंबेडकरी विचारधारा व आनेवालीपिढी की समस्या या विषयावर मार्गदर्शन करणार असून यावेळी त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समर्पण पुरस्कार देण्यात येणार आहे. सोबतच डॉ.संघमित्रा गोणारकर, अॅड.स्मिता कांबळे यांचे मार्गदर्शन होणार आहे.
13 एप्रीलला विविध स्पर्धाच्या बक्षीसांचे वितरण करण्यात येणार असून यावेही चित्रकला, निबंध, वकृत्व, सामान्य ज्ञान, स्मरणशक्ती, यवतमाळ आयडाल आदी पारितोषीत वितरीण होईल. सायंकाळी 6 वाजता अभियंता डी.जी. बोरकर प्रेरणा पुरस्कार, राजेंद्र सुर्यवंशी यांना देण्यात येणार असून पत्रकारीतेचा म.बा.मेश्राम पत्रकार पुरस्कार विलास गावंडे लोकमत यांना प्रदान करण्यात येणार आहे. सोबतच संतोष मनवर पोलीस उपनिरिक्षक यांचा सत्कार करण्यात येणार आहे. समारोपीय सत्रात पालकमंत्री मदन येरावार, आ.माणिकराव ठाकरे, ना.संजय राठोड, खा.भावना गवळी, माधुरी आडे, मनोहर नाईक,नगराध्यक्ष कांचन चौधरी, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, अनिल आडे, राजुदास जाधव, मो.तारीक लोखंडवाला उपस्थित राहणार आहे.
14 एप्रीलला सकाळी सुवर्ण प्रभात या संगीतय कायक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी 7 वाजता समता दौड चे उदघाटन शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांचे हस्ते व निवासी जिल्हाधिकारी नरेंद फुलझेले यांचे उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन विजय रंगारी, डॉ.सुभाष डोंगरे, गुड्‌डू मिर, निलेश भगत, किरण फुलझेले यांनी केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post