- जमाते इस्लामी हिन्दचा पुढाकार
सैय्यद मुजीबोद्दिन
पुसद:जातीय सलोखा निर्माण व्हावा हा दृष्टीकोन समोर ठेवून शहरातील विविध सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना निमंण देवून स्थानिक जमा अत ए इस्लामी हिंदच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सद्भावना मंचची स्थापना करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रदेश महासचिव अकील मिर्झा होते, यावेळी अ.हकीम शेख जिल्हा संघटक, काजीमदाद खान शहराध्यक्ष फिरोज अन्सारी आदी उपस्थित होते. यावेळी सुधीर देशमुख यांची मुख्य संयोजक म्हणून निवड करण्यात आली. तसेच सहसंयोजक म्हणून अॅड.अजहर खान, संतोष सुरवाडे, मौलवी युनुस, नितीन पवार, नईक शेख यांची एकमताने निवड झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविकि जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्रचे प्रदेश महासचिव अकील मिर्झा यांन केले. सद्भावना वाढीसाठी सभा, स्टडी सर्कल, व्याख्यान, सेमीनार, संभाषण, अधिवेशन आदी कार्यक्रम घेण्यात येतील आणि जातीय सलोखासाठी हँडबील, पोस्टर, पुस्तकांचे वितरण करणार असल्याचे फिरोज अन्सारी यांनी सांगीतलजे. कार्यक्रमाचे संचालन परवेज यांनी तर आभार काजीमदाद यांनी मानले.