अतुल नवघरे
लाखपुरी: ८ , सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलेक्मयुनिकेशन विभागात कार्यरत प्रा. सुनिलसिंह सुभाषसिंह मुंगोना हे अकोला जिल्हातील मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी येथील निवासी असुन त्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा तर्फे आचार्य पदवी बहाल करण्यात आली . त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन इंजीनिअरींग शाखेतुन "Development of VLSI Architecture for Biometrics image compression using wavelets" ह्या विषयावर शोधकार्य केले त्यांनी पांच ते सहा आंतराष्ट्रीय जनरल मधुन आपले शोधनिबंध सादर केले. आणि आपल्या शोध कार्यावर पेन्टन सुद्धा मिळवले आहे. ह्या शोधकार्यात त्यांना डॉ. एस .ए .लढके सरांचे मार्गदर्शक म्हणून लाभले । त्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या आई वडीलांना व कुटूंबाला व मित्र परिवाराला दिले आहे. महाविद्यालयाचे अध्यक्ष माननिय जगदीशभाऊ गुप्ता व प्राचार्य श्री. एस. ए . लढके सर व सर्व प्राध्यापक वृंदानी त्यांना या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहे.