इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीच्या सहअध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा म.नि प्र. गंगाधर महास्वामी याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या परिसरातील धार्मिक भक्ताचे श्रद्धास्थान असलेल्या औसा येथील नाथ संस्थान प्रमुख ह.भ.प.परमपूज्य गहिनीनाथ महाराज औसेकर यांची पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीच्या सहअध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल लोहारा तालुक्यातील जेवळी येथील श्री गुरू सिद्धेश्वर विरक्त मठात मठाचे मठाधीश म.नि.प्र.गुरू गंगाधर महास्वामी याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी हभप निलप्पा कोळी,ह.भ.प.कमलाकर कोळी,ह.भ.प.हरी गाडेकर,जेवळी याञा कमीटीचे अध्यक्ष बसवराज कारभारी,सचिव मल्लिनाथ डिग्गे, महादेव मोघे,गुंडाप्पा कारभारी,शिवशरण कारभारी, संजय तांबडे,मल्लिनाथ चिनगुडे,महादेव कार्ले, चेअरमन गजेद्र पाटील,रमेश साखरे,नागेश ढोबळे, राजू डिग्गे याच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.