जितेश करिया
हिवरखेड येथे जि प हायस्कूल मध्ये नुकतेच आय एम ए संघटना अकोट तसेच ग्रामपंचायत हि. वरखेड व मेडिकल असोसिएशन हिवरखेड च्या वतीने भव्य रोगनिदान शिबीर घेण्यात आले.या शिबीराचे उदघाटन आमदार श्री प्रकाश जी भारसाकडे यांनी केले तर कार्यक्रमच्या अध्यक्षा सौ शिल्पाताई मिलिंद कुमार भोपळे होत्या.या शिबिरामध्ये 1000 पेशंट तपासण्यात आले व औषधोपचार करण्यात आले.या प्रसंगी डॉ कैलास जपसरे यांनी हिवरखेड येथील पॅरालेसिस झालेले गरजू रुग्ण श्री त्रंबक शिंदपुरे यांच्यावर परिस्थिती चा विचार करता त्यांना शेवट पर्यंत मोफत उपचारासाठी दत्तक घेतले.या साठी डॉ जपसरे यांचे कौतुक होत आहे.या प्रसंगी मिलींद भोपळे, डॉ प्रशांत इंगळे अर्जुन खिरोडकार विनोद ढबाले नंदू शिंदपुरे उपस्थित होते