- बेकायदेशिर शिक्षक भर्ती व भुखंड घोटाळा भोवण्याची चिन्हे
विलास नस्ले
मुर्तिजापूर (प्रतिनिधी):- स्थानीक नगर परिषद मध्ये वर्ष 2012 च्या कारर्कीद मध्ये शिक्षकाची भर्ती करताणा आरक्षीत आरक्षण पदाचा विचार न करता चक्क खुल्या प्रवर्गातुन शिक्षकाची निवड सर्वसाधारण सभा दिनाक 24/2/2012 ठराव क्र 18 नुसार शिक्षकाच्या आरक्षणा मध्ये बदल करून पूर्ववत कायम ठेवले . मा उच्च न्यायालयाने सदर प्रकरणी न.पा. स्तरावर निर्णय घेणे बाबत सुचित केले होते. परंतु उपरोक्त ठरावाद्वारे तत्कालिन अध्यक्ष व सुचक , अनुमोदक यांनी शिक्षकांच्या आरक्षणात बदल करणे ,मा. न्यायालयाचे आदेशानुसार कारवाई न करणे, शिक्षकांचे सेवा पुस्तिकेत बेकायदेशिर नोंदी घेण्याचा ठराव पास करणे या सर्व बाबीं बेकायदेशीर असून फौजदारी गुन्ह्यास पात्र ठरत असल्याने संबंधितांना आपला लेखी खुलासा नोटीस प्राप्त होताच नगर परिषद कार्यालयात सादर करावा. विहीत मुदतीत प्राप्त न झाल्यास अथवा समाधानकारक असल्यास संबंधितांविरूध महाराष्ट्र नगर परिषदा . नगर पंचायती व औधोगिक नागरी अधिनियम 1965 च्या विहीत कलमा नुसार कार्यवाही केली जाईल असे नोटीस मध्ये नमुद आहे तर याच नगर परिषद मध्ये प्रकाश गंगारामजी बोनगीरे यांनी व इतर पाच यांनी केलेल्या तक्रारी नुसार या स्वरांज्य संस्थेने विविध ठराव हेतुपुस्पर पारीत करून व शासनाची दिश्याभुल करून शासन मालकीचे भुंखड लीलाव करून नाममात्र भाडे पटयावर दिले .या मुळे नगर परिषेदेचे आर्थिक नुकसान झाले आहे असे करण्या मांगे तत्कालीन नगरअध्यक्ष व माजी आजी नगरसेवकांचा काय हेतु होता ? या बाबत तसेच उपसंचालक मुंबई यांचे 2 एप्रिल 2018 चे पत्रा नुसार निविदा प्रक्रियेस जबाबदार अधिकारी व पदाधिकारी यांची यादी तात्काळ शासनाला सादर करावयाची आहे. कारण आपल्या कार्य काळात बी.ओ.टी. अंतर्गत दुकानांचे बांधकाम करण्यात आले. तसेच खुली जागा लिलाव करून तिन वर्षाच्या भाडे पट्यावर दिलेली आह.तसेच ठरावात जाहीर हर्रास रक्कम न घेता रूपये 50 हजार अनामत रक्कम व दरमहा भाडे 600/- रुपये घेतल्याचे निदर्षनास येते.यामुळे नगर परिषदेचे आर्थिक नुकसान केल्याचे दिसून येत आहे. असे करण्यामागे आपला उद्देश कोणता होता ? असेे संबंधितांंना दिलेल्या नोटीस मधेे नमूद असून विभागीीय आयुक्त यांनी 18 मे 2017 रोजी पारीत आदेशानुसार अतिक्र्र बांधकाम त्वरीत काढून प्रवेश द्वाराची खुली जागा आठवडी बाजारातील आरक्षित वाहनतळाची जागा व अतिक्रमीत जागेवरील केलेला लिलाव रद केेेेल्याचे नमूद केले आहे..सदर नोटीस मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांनी संबंधितांना पाठविली असून प्रतिलीपी वरिष्ठांना पाठविली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी आणखी काहींंवर कारवाई होणार असल्याची कुजबज सुुुरु आहे.