विलास नस्ले
मुर्तिजापूर (प्रतिनीधी) मुर्तिजापूर नगर परििषदेची सर्वसाधारण सभा आज दिनाांक 12 रोजी नगर परीषदेच्या सभागुहात पार पडली. यामध्ये विषय क्रं. 3 व 4 नुसार नगर परीषदेचे मुख्यधि कारी डोलारकर यांचे विरूध्द नगरसेवकांचा हक्कभंग व अविश्वास प्रकरणी ठराव पारीत करण्यात आला. नगर परिषदेचे नगरााध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, नगरसेवक यांनी दिलेल्या अविश्वास ठरावावर विचारविनीमय करण्याबाबतचा ठराव घेण्यात आला. या ठरावाचे सुचक नगरसेवक सुनिलपवार व अनुमोदक म्हणून सचिन देशमुख असून सदर ठराव पंधरा विरूध्द तीन मतांनी पारीत करण्यात आला. तर नगरसेवकांचा हक्कभंग झाल्याबददल सभेत मुख्यधिकारी यांचे विरूध्द कारवाही करण्यासाठी विचार विनीमय करणेबाबत ठराव घेण्यात आला. या ठरावाचे सूचक नगरसेवक सुनिल पवार अनुमोदक नगरसेविका सौ. धनश्री भेलोंडे हे आहेत. हा ठराव देखील पंधरा विरूध्द तीन असा पारीत करण्यात आला. मुख्यधिकारी डोलारकर यांचे विरूध्द विविध आरोप करण्यात आले असून मुख्यधिकारी हे वारंवार नगराध्यक्ष यांचा अपमान करीत असून कोणत्याही विषयावर वाद घालण्यांचा प्रयत्न करतात. मोठमोठयाने बोलून सर्वांवर एकाधिकार सारखे हुकुमी वातावरण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सदर प्रकार हा हक्कभंग असल्याचे नमुद केले आहे. ठरावाच्या बाजुने नगराघ्यक्षा सौ. मोनाली गावंडे, उपनगरध्यक्षा आलिया तबस्सुम नासीरोददीन, नगरसेवक सुनिल पवार, द्वारकाप्रसाद दुबे, सचिन देखमुख, आशिष बरे, रविंद्र इंगळे, वैभव यादव, प्रशांत डाबेराव, सौ. स्नेहाताई नाकट, सौ. धनश्री भेलोंडे, सौ. लक्ष्मीताई गोळे, सौ. सरीताताई पाटील, अनिसाबी शेख खलील, अफरोजाबी अब्दुल कलाम यांच्या स्वाक्ष-या आहेत. तर या ठरावाच्या विरोधात नगरसेवक विनायक गुल्हाने, तस्लीमखाॅं बिसमिल्लाखाॅ, सौ. सुनीता गुल्हाने यांच्या स्वाक्ष-या आहेत. गैरहजर नगरसेवकांमध्ये भारत जेठवाणी, सौ. प्रतिक्षा वसुकार, सौ. मंदाताई जळमकर, सौ. कविता गुल्हाने, सौ.ममता महाजन यांचा समावेष आहे.नगर परिषदेेेेत आणखी काय घडाामोडी घडतात याकडेे नाागरिकांमधे उत्सुकता दिसून येेेेत आहे.