सांगवा मेळ येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले व डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान दान करण्यात.आले



अतुल नवघरे                              
लाखपुरी: १३ ,क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले  व डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती  निमित्त सांगवा मेळ येथे दि.११/४/२०१८ रोजी भव्य दिव्य असे रक्तदान शिबीर ठेवण्यात आले होते. त्यामध्ये  लाखपुरी सर्कल मधील येणा-या सर्व कार्यकर्त्यांनी रक्तदान करून गोरगरिबांना मदत व्हावी यासाठी या दोन्ही महापुरुषांच्या विचारांना वंदन करून रक्तदान केले. तसेच सांगवा मेळ येथील भीम शक्ती युवा मंडळ व शिव शक्ती युवा मंडळ यांनी मोलाचा सहभाग दिला. रक्तादान शिबिराचे आयोजन सुशील भाऊ सिरसाट यांनी व त्यांच्या मित्र मंडळी यांनी केले होते त्या करिता सुशिलभाऊ सिरसाठ व त्यांच्या संपुर्ण टीमचे सर्व ईकडे कौतुक होतांना दिसत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post