कॉग्रेसच्या विरोधात भाजपाच्यावतीने आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-  राजकीय स्वार्थासाठी संसदेचे कामकाज वारंवार बंद पाडुन कॉग्रेस लोकशाहीचा अपमान करीत आहे.
असा आरोप करीत उस्मानाबाद जिल्हा
भाजपाच्यावतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर भाजप प्रदेश सरचिटणीस तथा आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली दि.12 एफ्रिल रोजी एक दिवस लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारत माता कि जय,राजकीय अंहकारापोटी लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या कॉग्रेस पक्षाचा धिक्कार असो,देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो,जय भवानी,जय शिवाजी,नरेंद्र मोदी तुम आगे बढो,अशा विविध घोषणा देवुन परिसर दणाणुन गेले होते.यावेळी आ.सुजितसिंह ठाकुर म्हणाले कि,मुळातच कॉग्रेस पक्षाला लोकशाही मान्य नाही.घराणेशाही मान्य असणारा हा पक्ष नेहमीच लोकशाही मान्य असल्याचा नेहमीच दिखावा करीत लोकशाहीची पालमल्ली करीत आहे.यांच्या उपोषणाचे नाटक सर्व देशाने पाहिले आहे.कॉग्रेसची नाळ जनतेशी नसुन नेहमी या कॉग्रेस पक्षाने खुर्ची व सत्तेचे राजकारण करीत आहे.देश नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कॉग्रेसला नाकारुन विकासाकडे वाटचाल करीत आहे.हे कॉग्रेसला पहावत नाही.त्यामुळे मरता क्या नही करता अशी अवस्था कॉग्रेसची झाली आहे.
कॉग्रेसने अशेच लोकशाही विरोधी कृत्य केले व विकासात आडकाठी आणली तर कॉग्रेस देशातुन नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगीतले.
या आंदोलनात भाजप जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी,
भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे,
अनिल काळे,नितीन भोसले,सुधीर पाटील,भाजप मिडिया विभाग जिल्हा अध्यक्ष धनंजय रणदिवे,प्रशांत कावरे,सुरेश पाटील,रामदास कोळगे,जि.प.चे  बांधकाम सभापती अभय चालुक्य,जि.प.सदस्य दिग्गविजय शिंदे,भाजप तालुका अध्यक्ष विक्रांत संगशेट्टी,सत्यवान सुरवसे,अँड.मिलिंद पाटील,दत्ता सोनटक्के,भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष प्रदिप शिंदे,संजय खुरुद,हेमंत कुलकर्णी,अरुण इगवे, सुनिल सुर्यवंशी,बालाजी कदम,सुरेश वाघ,नेताजी शिंदे,प्रविण चव्हाण, बाळासाहेब चव्हाण,पांडुरंग पवार,डॉ.गोविंद कोकाटे, सुजित ओव्हाळ,यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post