जिल्हा परिषद पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकवा - मा.खा.अरविंदजी सावंत




  • शेतकी सदन तेल्हारा येथे शिवसेना तालुका व शहराचा वतीने जिल्हा परिषद पंचायत समिती सर्कल प्रमुख शाखा प्रमुख बूथ प्रमुख यांची माननीय खासदार शिवसेना संपर्क प्रमुख अरविंदजी सावंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सभा संपन्न.


प्रवीण वैष्णव 
तेल्हारा प्रतिनिधी :- आज दिनांक 10-4 मंगळवार रोजी तेल्हारा येथील शेतकी सदन कृषी उत्पन्न बाजार समिती येथे तेल्हारा शिवसेनेचा वतीने जिल्हा परिषद पंचायत समिती सर्कल प्रमुख शाखा प्रमुख व बूथ प्रमुख यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शन खा.अरविंदजी सावंत यांनी शाखा प्रमुख बूथ प्रमुख जिल्हा परिषद पंचायत समिती सर्कल प्रमुख व शिवसैनिक यांना मार्गदर्शन केले यावेळी सावंत यांनी बोलताना शिवसैनिक व प्रत्येक पदाधिकारी थेट तालुक्यातील घराघरापर्यंत शिवसेनेचे विचार पोहोचवा व तालुक्यातील अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचा समस्या जाणून घ्या व त्या समस्या मार्गी लावण्याचे प्रयत्न करा व आगामी पंचायत समिती व जिल्ह परिषदेचा निवडणूका या स्वबळावर लढवण्याची घोषणा पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी अगोदरच केलेली असून येणारी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुक शिवसेना स्वबळावरच लढणार व प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिकांनी कामाला लागावे जेणे करून येणाऱ्या आगामी निवणुकीत जिल्हा परिषदवर शिवसेनेचा भगवा फडकायलाच हवा अशे आहवान शिवसेना संपर्क प्रमुख मा.खासदार अरविंदजी सावंत यांनी केले यावेळी आमदार गोपिकीशनजी बाजोरिया यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्रामुख्याने सहसंपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर जिल्हा प्रमुख नितीन देशमुख उपजिल्ह्याप्रमुख दिलीप बोचे मूर्तिजापूर जि.प.सदस्य महादेव गवळे डॉ विनीत हिंगणकर महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख मधुरताई सरदेसाई मायाताई मैसने राजेश्वरी शर्मा सरिता वाकोडे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी तेल्हारा शहर व तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येने शिवसेना व यावसेनेमध्ये जाहीर प्रवेश घेतला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक खारोडे,प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव प्रास्ताविक तालुका प्रमुख विजय मोहोड यावेळी उपस्थित तालुका प्रमुख शहर प्रमुख विक्रांत शिंदे प्रसिध्दी प्रमुख प्रवीण वैष्णव उप ता.प्रमुख संजय अढाउ विठ्ठल जोशी विक्रम खोटरे शिवा कुकडे पुरुषोत्तम गावंडे देवानंद फोकमारे जि. प सर्कल प्रमुख विक्की धांडे गणेश तीव्हने ज्ञानेश्वर आखरे नितीन बाळापुरे धामोडे सुधीर पाथरीकर प.स.सर्कल प्रमुख नागेश शेळके राऊत रवींद्र बाजारे विजय नवलकार रामेश्वर हागे हिवरखेड शहर प्रमुख अर्जुन गावंडे युवा सेना ता.प्र जयवंत चिकटे श.प्र.सचिन थाटे शिवसेना उप श प्र निलेश मुरेकर अमर ठाकूर माजी ता.प्र बंदुभाऊ रुद्रकार माजी श प्र राजेश वानखडे पप्पू सोनटक्के विवेक खारोडे निलेश धनभर बंटी राऊत अजय गावंडे संतोष साबळे आशिष शेळके विशाल नांदोकार व तेल्हारा तालुका व शहरातील आजी माजी पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते अशे प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव यांनी कळविले

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post