महात्मा फुले एक युगपुरुष....दादासाहेब भोपळे



जितेश करिया
हिवरखेड :-  महात्मा फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य मानव समाजाला प्रेरक ठरले असून ते सामाजिक क्रांती घडविणारे एक युगपुरुष होते, असे प्रतिपादन महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय दादासाहेब भोपळे ह्यांनी सहदेवराव भोपळे विद्यालयातील महात्मा फुले जयंती समारोहाप्रसंगी केले. या कार्यक्रमाच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष सत्यदेवराव गिऱ्हे, उपाध्यक्ष डॉ प्रमोद भोपळे, संचालक शिवशंकर मार्के, जेष्ठ संचालक अनिलकुमार भोपळे, सह्कार्यवाह श्यामशील भोपळे, प्राचार्य प्रमोद जानोतकर  हे होते. याप्रसंगी भोपळे विद्यालय व श्रीमती रतनबाई ताराचंद कानुंगा मराठी प्राथमिक वरिष्ठ शाळा यांनी संयुक्तपणे हिवरखेड नगरीतून भव्य रॅली चे आयोजन केले होते.  यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन कु ताथोड मॅडम तर आभारप्रदर्शन कु छायाताई गिरी यांनी केले.   

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post