मनामनात गझलदीप उजळला मुशायरा बहारदार जाहला.



मूर्तिज़ापुर :- गेल्या दोन महिन्यापासून आम्ही घेत असलेली मेहनत अखेर फळाला आली...आणि 8 एप्रिलला आयोजित केलेला' उ.रा.गिरी गझल पुरस्कार वितरण सोहळा व बहारदार मराठी गझल मुशायरा ' ख-या अर्थाने अविस्मरणीय झाला...या कार्यक्रमातील प्रत्येक क्षण हृद्यात साठवून ठेवण्यासारखा....!
आदरणीय गझलनवाज भिमरावजी पांचाळे, तहसिलदार राहुल तायडे साहेब,प्रा.डाॅ.चिंतामण कांबळे सर,डाॅ.गोपाल उपाध्ये सर ,विजयजी विल्हेकर,डाॅ.जगदीश वानखडे यांच्या शुभहस्ते सुरूवातीला दिपप्रज्वलन व महात्मा फुले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन झाले.त्यानंतर अस्मितादर्शकार गंगाधर पानतावणे ,जेमिनी कडू,संगीतसुर्य रामकृष्णजी कोल्हाळे यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यानंतर संदीप वाकोडे यांनी प्रास्ताविकातून गझलदीप प्रतिष्ठानची भुमिका मांडली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजय वडवेराव ,सुप्रिया जाधव,निर्मला सोनी यांना उ.रा.गिरी गझल पुरस्कार प्रदान करण्यात आले.मग सुरू झाली शब्दसुरांची अनोखी बरसात...खरं म्हणजे त्या दिवशी हवामान खात्याने गारपिट व वादळी
वा-याचा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज वेगळ्या अर्थाने खरा ठरवत कालच्या कार्यक्रमात भावनांच्या वादळी वा-यासह गझलधारा बरसल्या.....सिद्धार्थ भगत सरांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेला बहारदार मुशायरा संपूच नये असे वाटत होते.रसिक प्रत्येक गझलेला मनापासून दाद देत होते...आबेद शेख,विजय वडवेराव,किरणकुमार मडावी,संदीप वाकोडे, बाळू बेलखेडे,मिलिंद इंगळे, रवींद्र जवादे,मंगेश गजभिये,अ.वि.येलकर,मिलिंद हिवराळे,सुप्रिया जाधव,निर्मला सोनी यांच्या गझलांनी रसिक चिंब झाले....आणि शेवटी आदरणीय  गझलनवाज भिमरावजी पांचाळे यांच्या समारोपीय गझलगायनाने या संपुर्ण कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.पुरस्कार  वितरण व बहारदार मुशायरा या दोन्ही कार्यक्रमांचे अप्रतिम सुत्रसंचलन अनुक्रमे कविवर्य सुनील डोंगरदिवे सर व सुप्रसिद्ध गझलकार गोपाल मापारी यांनी केले.आभार राम आत्राम यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद राजंदेकर, विलास वानखडे,प्रमोद पंत,सुधीर वानखडे,गजानन वानखडे,माधवी वाकोडे,विनोद महल्ले,सुनील ढोकणे  यांनी अथक परिश्रम घेतले.यावेळी चित्रकार मिलिंद इंगळे यांनी आपल्या कुंल्यातून साकारलेली आदरणीय भिमरावजी पांचाळे यांची प्रतिमा त्यांना भेट दिली.रसिकांची भरगच्च उपस्थिती हे कार्यक्रमाचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य ठरले...!!!

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post