बेळंब तांडा जिल्हा परिषद शाळेत महात्मा फुले जयंती पासून प्रवेश सुरू


 उमरगा तालुका प्रतिनिधी    मा.श्री. चेतन दादा पवार
उमरगा तालुक्यातील बेळंब तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थपन समिती अध्यक्षा अनिता पवार, शाळेचे मुख्याध्यापक उमेश खोसे, सहशिक्षक महेश बदोले, सुभाष राठोड तसेच विध्यार्थी उपस्थित होते.
    प्रथमतः शाळेचे मुख्याध्यापक उमेश खोसे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अनिता पवार यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर महेश बदोले यांनी महात्मा फुले यांच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती सांगितली.  खोसे यांनी बोलताना सांगितले की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते पिल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तेंव्हा शिक्षण घ्या, मोठे व्हा. आयुष्य सुखी होईल.
      तदनंतर आज शिक्षणात क्रांती घडवून आणणारे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीपासून शाळेत प्रवेश सुरू करण्यात आले. बेळंब तांडा शाळा एक उत्कृष्ट शाळा असून डिजिटल व ई- लर्निंग शाळा आहे. तसेच शाळेला लवकरच आय.एस.ओ.नामांकन प्राप्त होणार आहे. तेंव्हा पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेतच करावा असे आवाहन खोसे यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशपात्र विध्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन प्रवेश देण्यात आला.
    सूत्रसंचालन सुभाष राठोड तर आभार प्रदर्शन महेश बदोले यांनी केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post