- बंडूभाऊ लवटे जिल्हा संघटक ग्राहक प्रहार संघटना यवतमाळ
यवतमाळ (प्रतिनिधि मक़सूद अली)
पांढरकवडा येथील स्व इंदुबाई बोरेले वृद्धाश्रमात ग्राहक प्रहार संघटने चे जिल्हा संघटक बंडूभाऊ लवटे ह्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला . त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष विलासभाऊ पवार प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ग्राहक प्रहार संघटनेचे जेष्ठ दामोधरजी बाजोरिया हे होते .व्यासपीठावरून बोलताना विलासभाऊ पवार म्हणाले ,ग्राहक प्रहार संघटना ग्राहक हिताचे कार्य करीत आहे त्या सोबत आपल्या कार्यकर्त्याचे वाढदिवस कोंबड्या बकऱ्या दारू पिउन साजरे न करता हिन दिन लोकात साजरा करीत आहे त्याचा समाजावर नक्कीच खोलवर परिणाम होईल . बंडूभाऊ लवटे ह्यांचा शाल श्रीफळ देऊन सम्मान करण्यात आला . बंडूभाऊ लवटेे म्हणाले ,संघटनेने माझ्या वाढदिवसाची आठवण ठेऊन जो आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला तो पाहून मला सांगावेसे वाटते ,वाढदिवस हा हीन दिन लोकात साजरा करायला हवा . वर्षभर आपण आपल्या साठी जगतो कधीतरी एखाद दिवस दुसऱ्या साठी जगून पहा . केक कापून निराधार वृद्ध लोकांना वाटण्यात आला . सोबत मिठाई व प्रत्येकाला उपरणे देण्यात आले . संघटने तर्फे दामोधरजी बाजोरिया ह्यांनी उपरणे बंडूभाऊला भेट दिले . ह्या कार्यक्रमाचे संचालन ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर ह्यांनी केले . प्रास्तविक भैय्यासाहेब ठमके जिल्हा सहसचिव ह्यांनी केले .आभार सुनील धवने ह्यांनी मानले कार्यक्रमाला ग्राहक प्रहार संघटनेचे प्रकाश पुरोहित प्रहार जनशक्ती पार्टीचे मनोज आडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
बहोत बढिया!
Replyपढा मगर सुनाने को नही मिला