इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील बी.एस.एस.कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.एन. रेडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक समतेचे प्रणेते व अग्रदूत होते असे गौरवोद्गार काढले.या प्रसंगी महाविद्यालयातीळ प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.