- गोंडवाना एक्सप्रेसला प्रायोगिक तत्वावर थांबा दिल्याने जनतेत नाराजीचा सुर
- गेल्या दहा वर्षापासून केल्या जाणा-या प्रमुख मागण्यांना केराची टोपली.
विलास नस्ले
मुर्तिजापूर( प्रतिनीधी) वैराग्य मुर्ती संत गाडगे बाबा यांची कर्मभूमी असलेले मुर्तिजापूर येथील जंक्शन रेल्वे स्टेशन अनेक समस्यांनी ग्रस्त असुन यामुळे या रेल्वे स्टेशन वरून दररोज प्रवास करणारे हजारो प्रवाशी त्रस्त झाले आहेत. त्यांना अनेक वर्षापासुन नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने दि. 5-4-2018 पासून गोंडवाना एक्सप्रेस गाडी क्र. 12405 - 124069 भुसावळ - दिल्ली या गाडीला 6 महिन्याच्या अवधीसाठी प्रयोगिक तत्वावर थांबा देवून महत्वाच्या गाडयांना थांबा देण्याबाबतच्या व रेल्वे प्रवाशांच्या हिताच्या मागण्यांकडे सपसेल दुर्लक्ष करून जनतेसह प्रवासीवर्गाच्या तोंडला पाने पुसल्याची भावना जनतेतुन व्यक्त केल्या जात आहे. मुर्तिजापूर येथील अनेक सामाजिक संस्था, प्रवाशी वर्ग यांचे कडून ऐतिहासीक शकुंतला नॅरोगेजचा विकास करून सदर गाडी मुर्तिजापूर - अचलपूर व पुढे मध्यप्रदेश आणि मुर्तिजापूर - यवतमाळ व पुढे आन्ध्रप्रदेशला जोडण्यात यावी आणि मुर्तिजापूर दारव्हा मार्गे पुसद रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते आहे. आझाद हिंद एक्सप्रेस गाडी क्र. 12130 - 12129, पुरी-- अहमदाबाद एक्सप्रेस गाडी क्र. 12843 - 12844, अमरावती -तिरूपती ,ओखापूरी ,यशवंतपुरम-इंदोर,बिकानेर या गाडयांना थांबा देण्यात यावा कारण पुणे येथे जाण्याकरिता महाराष्ट्र एक्सप्रेसची एकमेव सुवीधा या रेल्वे स्टेशनवरून आहे. या स्टेशनवरून अमरावती जिल्हयातील अंजनगाव, दर्यापूर, परतवाडा, अचलपूर, वाशिम जिल्हयातील कारंजा, दारव्हा, दिग्रस, मंगरूळपीर, यवतमाळ या तालुक्यातील प्रवाशी जाणे - येणे करतात. पुणे येथे शिक्षणाकरीता आणि कामानिमित्त विद्यार्थी व चाकरमाने यांची संख्या देखील मोठया प्रमाणात आहे. तर गुजरात राज्यात जाण्याकरीता हावडा - अहमदाबाद व नवजीवन एक्सप्रेस, या दोनच गाडया असून दोन गाडया मध्ये जवळपास 17 - 18 तासाचे अंतर आहे. करिता आझाद हिंद एक्सप्रेसला थांबा मिळने गरजेचे आहे. सर्व गााड्यांच्या सर्वसाधरण (जनरल) डब्यांमध्ये वाढ करावी. मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावर प्लॅट फार्म वरील शेडचे दोन्ही बाजुला रूंदीकरण करावे. मुर्तिजापूर रेल्वे स्टेशन येथुन बंद केलेल्या सुवीधा पुर्ववत सुरू करण्यात याव्या. या करीता सामाजीक संघटनांच्या वतीने सन 2011 पासून वेळोवेळी मागण्या करण्यात आल्या असतांना याकडे सपसेल दुर्लक्ष करण्यात आले आहे. सदर मागण्यांची पुर्तता व्हावी याकरिता साखळी उपोषण , आमरण उपोषण सन 2011 साली करण्यात आले. त्यानंतर वेळोवेळी या मागण्याकरीता पाठपुरावा करण्यात आला. परंतु रेल्वे प्रशासनाकडूून मुर्तिजापूर रेल्वे स्थानकाला दुय्यम तसचे सावत्रपणाची वागणूक देण्याची भुमिका सतत सुरूच असल्याचे चर्चेवरून दिसुन येत आहे. मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावर ओखापूरी तसेच यशवंतपूरम -इंदौर , बिकानेर एक्सप्रेस या गाडयांना लवकरत लवकर थांबा खासदार संजयभाऊ धोत्रे व आमदार हरीषभाऊ पिंंपळे यांनी मिळवून दयावा अशी मागणी जनतेसह प्रवाशीवर्गाकडून केली जात आहे. रेल्वे प्रशासन आता तरी जागे होऊन महान संत गाडगेबाबां- च्या कर्मभूमिला न्याय देण्यासाठी पाउले उचलणार का ? या प्रश्नाचे उत्तर येणा-या काळात मिळण्यासाठी वाट पाहणे एवढेच आपल्या हातात आहे. मागण्यांच्या पूर्ततेसाठी काही सामाजिक संघटनांद्वारा आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे समजले.
