![]() |
हिंदुस्थानात जय जवान जय किसान चा नारा अधिक मजबूत असेल तरच देश पुढे जाईल असे प्रतिपादन महसुल राज्यमंत्री ना. संजय राठोड यांनी पांढरकवडा येथे केले.लोकहित बहुउद्देशीय संस्था यवतमाळ, द्वारा आयोजीत आझाद हिंद सेना प्रमुख, नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती निमित्य आयोजीत जागो हिंदुस्थानी कार्यक्रमाच्या व्यासपिठावर ते बोलत होते. यावेळी शहीद सैनिकांचा परिवार व माजी सैनिकांचा परिवारासह सत्काराचा कार्यक्रमही घेण्यात आला. महसुल राज्यमंत्री ना. संजय राठोड व लोकनेते अण्णासाहेब पारवेकर यांच्या शुभ हस्ते हा माजी सैनिकांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे , सुभाषचंद्रबोस व शहीद सैनिक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे मान्यवरांचे हस्ते स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहिद सैनिकांचा परिवार व माजी सैनिक यांचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला त्यामध्ये ज्ञानेश्वर सोयाम, परशुराम कुडमेथे, विनोद मेल्केवार, विजय आत्राम, वसंता सोयाम वसंता मडावी, विजय कुकसे, कर्णुजी पेंदोर, विश्वास मेश्राम, वामन भालीकर, अजय दुमनवार, दिवाकर जक्कावार, जगन्नाथ पापरे, हनुमान पेंदोर, पुष्पाताई तोडासे, विकास मोरे, छत्रपती शेडमाके, जयवंत आत्राम, मारोती नैताम, खंडाळकर, राजेश बागडे, कवडूजी कोवे, बबन सोयाम, एस पी जाधव, कुळसंगे, पंुडलीक कुळसंगे, श्रावण मेश्राम, परशुराम दडांजे, दयानंद सुरपाम, रामकृष्ण टेकाम, अशोक निम्मनवार, कल्पना बर्रेवार, ताराबाई व्यास, कवडूजी उगे, वासुदेव बोरखडे, सुरेश इंगोले, विलास काकडे, यांचा सन्मान करण्यात आला, शहिद नागेश्वर जिड्डेवार व इतर यांच्या परिवारालाही यावेळी सन्मानीत करण्यात आले.या कार्यक्रमाला संबोधीत करतांना ना. राठोड म्हणाले की हे सैनिक देशाच्या सिमेवर डोळ्यात तेल घालुन पहारा करीत असतात आपलं ते दुश्मनांपासुन रक्षण करीत असतात त्यामुळेच देशातील प्रत्येक नागरिक शांतपणे झोपू शकतो याची जाणिव आपण प्रत्येकाने ठेवली पाहीजे. आपल्याला सैनिकांबद्दल अभिमान व स्वाभिमान असला पाहीजे याचीही जाणिव प्रत्येक भारतीयाने ठेवावी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्याबद्दल घेतलेली भुमिका हे देशवासी कधीच विसरणार नाही वंदनीय बाळासाहेबांचे कार्यही तशाच प्रकारचे आहे हा हिंदुस्थान घडविण्यात त्यांचेही योगदान आहे असेही ना. संजय राठोड म्हणाले. चिन आणि पाकिस्तान या दोन शेजारील देशांपासून भारताला धोका आहे. आपले सैनिकच आपल्याला त्यापासून वाचवतात असेही ते म्हणाले. जय जवान जय किसान चा नारा भारताचे माजी पंतप्रधान स्व. लालबहाद्दुर शास्त्री यांनी दिला होता. जवान आणि किसान मजबुत असेल तर देश नक्कीच पुढे जाईल असेही ना. राठोड यांनी आवर्जुन सांगीतले. शिवसेनेची भुमिका ही शेतकयांच्या हिताचीच राहीली आहे आणि पुढेही ती शेतकयांच्या हिताचीच असेल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान लोकनेते अण्णासाहेब पारवेकर यांचेची अध्यक्षीय भाषण झाले या कार्यक्रमाचे संचालन गुरूकुल स्कुल चे प्राचार्य विजय देशपांडे यांनी केले. त्यानंतर जागो हिंदुस्थानी या जागतिक दर्जाचा हिंदी मराठी गाण्यांचा श्रवणीय कार्यक्रमाने उपस्थितांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमातून देशाचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न कार्यक्रमाचे आयोजक शुल्का यांनी केला. कार्यक्रमाने उपस्थितांचे मन जिंकले. प्रत्येकाच्या मनात देशप्रेम जागविणारा हा कार्यक्रम ठरला. या कार्यक्रमातून स्वच्छतेचा, देशभक्तीचा, अन्यायाविरूध्द आवाज उठविण्याचा व भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता भ्रष्ट नेत्यांना त्यांची जागा दाखविण्याचा मोलाचा संदेशही जनतेला देण्यात आला. व जनतेची जबाबदारी काय याचेशी त्यांना अवगत करून देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुखांनी ना. संजय राठोड व स्थानिक आयोजक तथा जि.प.सदस्य गजानन बेजंकीवार यांचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी व्यासपिठावर लोकनेते अण्णासाहेब पारवेकर, संतोषभाऊ बोरेले, हरिहर लिंगनवार, प्रविण शिंदे , नगराध्यक्षा सौ वैशाली अभिनय नहाते, गजानन बेजंकीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.