![]() |
जमाते इस्लामी हिन्द महाराष्ट्रच्या वतीने शांती, प्रगती व मुक्तिसाठी इस्लाम या शिर्षकाअंतर्गत दिनांक १२ ते २१ जानेवारी पर्यंत राज्यव्यापी अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविन्यात आला या निमित्याने दिनांक १९ जानेवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे विविध कार्येक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पुसद येथील पंचायत समितीचे श्री शिवाजी सभागृहात जाहिर व्याख्यानचा कार्येक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी जमाते इस्लामी हिन्द महाराष्ट्र प्रदेशचे सल्लागार समिति सचिव ज़मीर कादरी यांनी प्रास्ताविक सादर केले व नौशाद उस्मान यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर संतोष सुरवाडे वाशिम जिल्हा प्रभारी भारत मुक्ति मोर्चा यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब गावंडे संयोजक संवैधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियान यवतमाळ संवैधानिक विषयवार तथा कुरआन व इस्लामिक तत्ववार आधारीत मार्गदर्शन केले. मौलाना एजाज़ असलम यांनी आपल्या अध्येक्षीय भाषणात सांगितले की, आपला भारत देश सर्वच क्षेत्रात प्रगतीपाथावर असला तरी नैतिकता विसरली जात आहे देशाची आर्थिक व्यवस्था ढासळली जात आहे आन्तर्राष्ट्रीय बैंकेकडून लादन्यात आलेल्या कर्जाच्या व्याजपोटी इतर देशांच्या तुलनेत आम्ही खुप मागे गेलो आहे पारलौकिक तत्ववार आधारित जीवन व्यवस्था असेल तरच खरी शांती प्रगती आणि मुक्ति होऊ शकते जर आपल्याला भारत देशात शांती आणि प्रगती निर्माण करावयाची असेल तर इशपरायणतेच्य आधारावच करू शकतो ज्यामुळे प्रत्येक समाजाला मुक्ति मिळू शकतो समस्त मानव जात एकाच आदम आणि हव्वा ची संतान आहे आणि या नात्याने भूतलावरिल समस्त मानव आपसांत भाऊ-भाऊ आहे ही शिकवण प्रत्येकाने जोपासवी असे आवाहन महोदयांनी केले. कार्येक्रमाला विशेष उपस्थिति म्हणून दिगांबर जगताप राज्य संघटक मराठा सेवा संघ, सुधीर देशमुख प्रदेश कार्यअध्य संभाजी ब्रिगेड, संतोष सुरवाडे वाशिम जिल्हा प्रभारी भारत मुक्ति मोर्चा, मिलिंद हट्टेकर अध्यक्ष पज्ञापर्व समिती पुसद, नितिन पवार जिल्हा उपाध्यक्ष मराठा सेवा संघ व प्रभाकरराव टेटर शहर अध्यक्ष मराठा सेवा संघ, अर्जुन लोखंडे नगरसेवक, दीपक काळे मराठा युवामांच पुसद, प्रमुख उपस्थिति म्हणून डॉ. वजाहत मिर्झा जिल्हा अध्यक्ष कांग्रेस कमेटी यवतमाळ, डॉ. मोहम्मद नदीम माजी उपाध्यक्ष नगर परिषद पुसद, मौलवी यूनुस बुखारी जिल्हा अध्यक्ष जमीयतुउलमा, शेख कय्यूम, अब्दुल हकीम शेख जिल्हाअध्यक्ष जमाते इस्लामी हिंद, मतीन अहमाद खान जिल्हाअध्यक्ष अल्पसंख्यक सेल यवतमाळ, एजाज अहमाद खान माजी उपाध्यक्ष नगर परिषद पुसद, सय्यद रियासत अली शहरअध्यक्ष रॉका पुसद, मोहम्मद साबीर अध्यक्ष वहदते इस्लामी पुसद, साकिब शाह नगरसेवक व अनेक मान्यवर प्रमुख्याने उपस्थित होते. कार्येमाचे संचालन तारीक अहमाद खान यांनी केले तर आभार प्रदर्शन अब्दुल हकीम शेख यांनी केले.