![]() |
साजिद पतलेवाले
दिग्रस:- फेसबुकवर अश्लील,बदनामीकारक आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या व त्या मजकुराला पसंती दर्शविणाऱ्या विरुद्ध दिग्रस पोलिसात आश्विन दादाराव चौधरी रा.शास्त्रीनगर याने तक्रार दाखल केली व संभाजी ब्रिगेड तर्फे या घटनेच्या निषेधाचे पोलिसात निवेदन देऊन आरोपीला तात्काळ अटक व कठोर कार्यवाही करण्याबाबत आज दि.२० जानेवारी २०१८ रोजी निवेदन सादर केले. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करून आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविणे सुरू केले आहेराष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले ह्यांच्याबद्दल अश्लील,बदनामीकारक मजकुराची पोस्ट फेसबुकवर आरोपी अरविंद चव्हाण याने प्रसारित केली व सदर अश्लील मजकुराच्या पोस्टला आरोपी किशोर कोरडे यांनी पसंती दर्शविलेले दिसली.याबाबत काही क्षणातच दिग्रस शहरात वातावरण तापले होते.तेव्हा संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी एकत्र येऊन पोलीस स्टेशन गाठून याबाबत आश्विन दादाराव चौधरी यांनी सदर घटनेची तक्रार पोलिसात दाखल केली तसेच संभाजी ब्रिगेड यांनी या घटनेचा निषेधाचे निवेदन पोलिसांना देऊन आरोपीला अटक करून कठोर कार्यवाहीची मागणीचे निवेदन सादर केले.या प्रकरणी दिग्रस पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांनी तक्रार घेऊन आरोपी अरविंद चव्हाण,किशोर कोरडे यांच्यावर भारतीय दंड सहिता १८६० अंतर्गत कलम २९५ (अ),६७ अंतर्गत अधिनियम २००० माहिती तंत्रज्ञान नुसार गुन्ह्याची नोंद करून अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.सदर घटनेची गावात चर्चा होताच भावना दुखावल्या नागरिकांनी मानोरा चौकात रास्ता रोको करण्याच्या पवित्र्यात असतांना पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले,सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत सिरसाट,उपनिरीक्षक गणेश मोरे,सतीश वळवी,बाबाराव पवार,पुंडलिक वानखडे सह पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले व नागरिकांना सांगण्यात आले की,याबाबत तक्रार दाखल करा आम्ही आरोपीला अटक करून कठोर कार्यवाही करू तेव्हा सर्व नागरिकांनी पोलीस स्टेशन गाठले व पोलिसात फिर्यादी आश्विन दादाराव चौधरी याने तक्रार दाखल केली व संभाजी ब्रिगेड यांनी निषेध निवेदन सादर केले होते.