![]() |
मूर्तीजापुर - येथून जवळच येत असलेल्या श्रीक्षेत्र लाखपुरी फाटयावर काही लोकांनी विनाकारण शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन मुलांना खेळणे साठी उपयोगी असणाऱ्या किक्रेटच्या बँटने छातीवर मारून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशी तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात बस वाहक सागर रामकृष्ण गावंडे यांनी दिलेल्या वरून पोलिसांनी तीन जणाविरूध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दर्यापूर जि. अमरावती आगाराची बस क्रमांकाची बस नंबर एम. एच/40/एन/8075 या गाडीवर चालक रवींद्र नवघरे आणि वाहक सागर गावंडे कार्यरत असताना ही बस मूर्तीजापुर येथून प्रवासी घेऊन निघली असता दर्यापूर येथे पोहचली. प्रवाशी याची गर्दी पाहता एक शाळकरी विद्यार्थी याने जागा पकडण्यासाठी बसच्या खिडकीतून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला असता वाहक सागर गावंडे यांनी त्याला हटकले असता त्याने वाद निर्माण करून याची माहिती लाखपुरी येथील त्याचा भाऊ गजानन चव्हाण याला फोन करून दिली. गाडी लाखपुरी फाटयावर आली असता पूर्वीपासून फाटयावर 10/15 लोक जमा होते. बस थांबली असता जमा लोकापैकी तिघांनी वाहका सोबत वाद निर्माण करून शिवीगाळ केली. बस मधील विधार्थी याने त्याचे जवळील बँटने वाहकाचे छातीवर मारली. 2/3 ईसमापैकी तोताराम देशमुख रा. लाखपुरी यांनी लाथा बुक्कानी मारहाण केली. याझटापटीत वाहकाचा शर्ट फाटले आणि तिकीट मशीन खाली पडून पैसे ही पडले.नंतर त्या मूलाचे नाव दिलीप चव्हाण असून तो लाखपुरी येथेच राहताे. अश्या दिलेल्या तक्रारीवरून मूर्तीजापुर ग्रामीण पोलिसांनी आरोपी दिलीप गणेश चव्हाण, गजानन गणेश चव्हाण, तोताराम देशमुख, एक ईसमाविरूध कलम ३५३, ३३२,५०४,३४भादवी नुसार गुनहा दाखल केला आहे़. पुढील तपास सुरू आहे़.