![]() |
जिल्हा प्रतिनिधि, मक़सूद अली
यवतमाळ : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघाची कार्यकारिणी आज गठित करण्यात आली असून अध्यक्षपदी सर्वानुमते सुनील पुनवटकर यांची निवड करण्यात आली आहे . बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी ने परंपरागत महसुली क्षेत्र निहाय पक्षाची बांधणी विसर्जित करून नव्याने राजकीय दृष्ट्या पक्ष मजबूत रित्या बांधण्याचे ठरविले असून या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आठ दिवसापूर्वी विदर्भातील पक्षाच्या सर्व जिल्हा कार्यकारींरिन्या विसर्जित केल्या होत्या. विदर्भ प्रदेश अध्यक्ष दशरथ मडावी यांच्या अध्यक्षतेखाली आज विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघाच्या कार्यकारिणीत प्रा . वसंतराव कनाके , इंजि. राजाभाऊ पावशेकर , मोईनूद्दीन शेख यांची उपाध्यक्षपदी तर अड . नरेंद्र भगत , प्रा . अजबरव खंडारे , किशोर मानकर यांची महासचिव म्हणून निवड करण्यात आली . याव्यतिरिक्त सचिव – मंशोधन जोगळेकर ,कोशाध्यक्ष – भीमराव लिंगे , बामसेफ संयोजक- संजय माटे . महिला आघाडी संयोजक – प्रा. डॉ .सुंनंदाताई वालदे , बहुजन रिपब्लिकन विध्यार्थी मोर्चा संयोजक – प्रमेय सोनोणे , बहुजन वोलिंटरी फोर्स संयोजक – नीलेश ढोकणे , कार्यकारिणी सदस्य – विनोद काळे ,नागोराव गेडाम , प्रा. दिनेश भालेराव ,संतोष राऊत , नामदेवरव पेंदोर ,नाना केराम ,परशुराम टेकाम , यांची निवड करण्यात आली आहे . विदर्भातील नवनियुक्त पदाधिकार्यांचे अधिवेशन येत्या 26 जानेवारी रोजी नागपुर येथे होत असून या अधिवेशनाला पक्ष्याचे संस्थापक अध्यक्ष अड. डॉ. सुरश माने मार्गदर्शन करणार आहे. याशिवाय पक्षाच्या वतीने येत्या 7 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा कचेरीसमोर, सर्वत्र होत असलेल्या मतदांनातील ईव्हीएम घोटाळ्याच्या विरोधात , व भीमा कोरेगाव दंगलीस जबाबदार मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेसाठी निषेध धरणे आंदोलन करण्याचे ठरले आहे .