![]() |
यवतमाळ - विधिमंडळात बोन्डअळी ग्रस्त शेतकऱ्यांची शासनाने जाहीर केलेली हेक्टरी ३० हजार ते ३७ हजार ची मदत सरसकट व विनाविलंब देण्यात यावी या मागणीसाठी यवतमाळ जिल्हा शेतकरी संघर्ष समिती,काँग्रेस ,मनसे, राष्ट्रीय युवा संघटन,शेतकरी संघटना,शेतकरी वारकरी संघटना,बेंबला कालवे संघर्ष समिती यांनी पुकारलेल्या चक्री धरणे आंदोलनाच्या चवथ्या दिवशी दिग्रस विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांसह आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांनी मोठा सहभाग घेऊन दिलेली आश्वासने न पाळणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध केला स्थानिक तिरंगा चौकात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या चक्री धरणे आंदोलनाचा आजचा दिवस दिग्रस विधानसभा मतदार संघाचे होता. "शेतकऱ्यांचे मरण हेच फडणवीस सरकार चे धोरण " असल्याचा आरोप या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांनी केला.स्वामिनाथन आयोगाची अमलबजावणी करून शेतकऱ्यांना ५०% नफा मिळेल अशा प्रकारचे भाव शेतमालाला देऊ असे म्हणून सत्तेवर आलेल्या दिल्ली व मुंबईतील सरकारनी शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक चालवलेली आहे.त्यामुळे या सरकारने सत्तेवर राहण्याचा अधिकार गमवला आहे अशाही भावना सहभागी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. या प्रसंगी शेतकरी विधवांनी घरधानी गेल्या नंतर शेती व कुटुंबाची झालेली दुरवस्था परवड डोळ्यात पाणी आणून कथन केली.या आंदोलनात शेतकरी विधवा इंदूबाई भगवानराव देठे,पारबती माणिक कुडमथे, विमल श्रीराम देहाराकर,जयश्री संजय बोडे,सविता भारत जोगी,वंदना अरुण आडे,रेणुका गजानन सलाम,सुभद्रा रामचंद्र काळे,सारिका मोहन ताजने राहणार पिंपलबुटी यांचा समावेश होता.शेतकरी विधवांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. आजच्या या धरणे आंदोलनाचे नेतृत्व राहुल ठाकरे ,अशोक बोबडे,प्रवीण देशमुख ,अरुण राऊत,मनसेचे अनिल हमदापुरे,प्रफुल मानकर,मनीष पाटील,सुधीर जवादे,बाबसाहेब गाडे, ,माधुरी अराठे,,दिनेश गोगरकर,किरण कुमरे,पंजाबराव खोडके,मनमोहनसिंग चव्हाण,सिकंदर शहा,काका ओले पाटील,प्रकाश नवरंगे,अशोक भुतडा,ज्ञानेश्वर बोरकर,पंढरी सिंहे, सुधाकर जाधव,विजय धोटे,भरत देशमुख,राजेंद्र चव्हाण,जाफर खान,विनायक भेंडे,राजू माहुरे, नानासाहेब भोकरे,धर्मेंद्र दुधे,संजय ठाकरे,विलास बोनकिले, सुनील वानखडे,राजेंद्र चिरडे,दिलीप तिमाणे,पंढरी गुलन्हाने, सुभाष गुगलिया, अनिल पाटील,दिलीप चौधरी,नासिर भाई झुंबर,विक्की राऊत,कृष्णा पुसनाके,शंकर बन्सोड, यासह मतदार संघातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.