![]() |
अकोला: वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समग्र साहित्याचा प्रसार व प्रचार प्रचंड प्रमाणात होण्याच्या दृष्टीने अ. भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज च्या तत्वप्रणाली नुसार जिल्हा अकोला श्रीगुरुदेव सेवकांच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन समितीच्या वतीने अकोला येथे दि 25 व 26 नोव्हेंबर 2017 ला 5 वे राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन भव्य प्रमाणात स्वराज्य भवन येथे आयोजित केले होते .संपूर्ण संमेलन लोक चळवळ व्हावी यासाठी विविध सामाजिक संगठना, शाळा ,कॉलेज,अकोला कृषी विद्यापीठ, अमरावती संत गाडगे बाबा विद्यापीठ ,नागपूर विद्यापीठ, यांच्या सहकार्याने दान दाते मंडळी ,साहित्यिक,पत्रकार यांच्या योगदानाची यशवीरित्या पार पडले आहे. संमेलनाध्यक्ष जेष्ठ प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज होते, तर स्वागताध्यक्ष जेष्ठ समाजसेवक कृष्णा भाऊ अंधारे हे होते, या दोन दिवसीय संमेलनात राज्यभरातून अनेक विध्वाण संत साहित्यिक समीक्षक ,कथाकार,नाटककार,राष्ट्रीय कीर्तनकार,प्रवचनकार,अ. भा. श्रीगुरुदेव सेवमंडळाचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी,ह.भ.प.आमले महाराज,डॉ भास्करराव विघे गुरुजी,श्री संदिपाल महाराज ,जेष्ठ कवी यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन यशवीरित्या पार पडले असून सदर संमेलनाचा जमा खर्च हा आढावा बैठक मध्ये दरवर्षी सादर होत असतो ह्यावर्षी सुध्दा चांदुर येथील निष्ठावान शेतकरी शिवा पुंडलिक महल्ले यांच्या वाडी मध्ये दिनांक 21 जानेवारी ला आढावा बैठकीचे आयोजन श्री आमले महाराज यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते प्रमुख उपस्थित मध्ये अकोला आमदार गोवर्धन शर्मा ,मुकुटराव बेले,डॉ गजानन नारे,भाना राऊत,सुमनताई गावंडे,प्रा.हरिदास गाहूकर,गणेश पोटे,दिलीप असरे,संजयची चौधरी,अरविद भोंडे,किशोर बळी, श्रीकृष्ण ठोंबरे,मधुकर सरप,ऍड.कोहाडे, खडसे गुरुजी,प्रा.संजय गोडे,डॉ नेमाडे,डॉ.देठे,बाळू पाटील महोरे,ज्ञानदेवराव मैसने,समदानजी बंड,मुठाड साहेब, ऍड विलास बेले, तसेच दैनिक लोकमत चे संपादक श्री शेंगोकार साहेब प्रमुख्यात उपस्तीत होते, या प्रसंगी ज्ञानेश्वर सकारकार व रामेश्वर बरगट यांनी संमेलनाचा लेखा जोखा वाचून दाखवला आणि पुळील कार्याच्या दृष्टीने सूचना मागितल्या या सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले आढावा बैठकीचे प्रास्ताविक रामेश्वर बरगट यांनी केले तर सूत्र संचालन श्रीकांत पुंडकर यांनी व आभार प्रदर्शन धनंजय मिश्रा यांनी केले ह्या प्रासंगी साहित्य संमेलन समितीचे पदाधिकारी रामेश्वर बरगट,ज्ञानेश्वर सकारकर, श्रीपाद खेडकर,अभिजीत गाहूकर,उपाध्यक्ष प्रमोद शेंडे, सरचिटणीस राजेंद्र झामरे, माणिक शेडके,किसनराव कडू,युवा फाऊंडेशनचे आकाश हरणे, अनिकेत तायडे,तुषार बरगट,राजेश गावंडे,सुरज भांगे,अनुज भारसाकडे, उमरी सेवा समितीचे अध्यक्ष देविदास अजनकर, संजय इंगळे,सतीश ताले, सुभाष जैयस्वाल,डॉ.रवि येवले,ऍड मृणाल कोहळे,ऍड निलेश मरकाळे,अभिजित महल्ले, प्रल्हाद निखळे, अरविंद इंगळे इत्यादिशह अनेक कार्यकर्ते आढावा बैठक यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले,सांगता राष्ट्रवंदना व भोजनाने झाली