बिटस्तरीय सामने संपन्न ब्रम्ही खुर्द


विलास नसले 
 ब्रम्ही खुर्द -  आज दि. 23/01/2018 ला जि.प.डिजिटल केंद्रशाळा,ब्रम्ही खुर्दच्या प्रशस्त क्रिडांगणावर शालेय विद्यार्थ्यांचे ब्रम्ही बीटचे सामने सहा केंद्राच्या संयोजक केंद्रप्रमुख मंडळाच्या  मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले सर्व प्रथम राष्ट्रगीत व सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त ब्रम्ही च्या नवनिर्वाचित सरपंच सौ.मंगला बाळू सांगोळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व सामन्यांचे उद्घाटन होऊन विविध खेळ व स्पर्धांना सुरुवात झाली.यामध्ये कबड्डी, खो खो, क्रिकेट, हाँलीबाँल,फुटबॉल या सांघिक खेळांबरोबर  
दौड,रिले,भालाफेक,कुस्ती,गोळाफेक, थालिफेक,उंचउडी,लांबउडी,दोरीवरिल उड्या,सूर्यनमस्कार,बुद्धिबळ,इत्यादी खेळांचा समावेश होता.
 स्पर्धा सुरु असतांना मा.सहाय्यक गटविकास अधिकारी वानखडे साहेब, गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत साहेब* यांनी भेटी देऊन
स्पर्धेच्या नियोजनबाबत,मैदान व्यवस्था, विद्यार्थी माध्यान्ह भोजन व शिस्तीबाबत प्रशंसा केली.स्पर्धेकरिता सहाही केंद्राचे सन्माननीय केंद्रप्रमुख, सर्व शिक्षकबंधू, शि्क्षिका,व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता पंच व निवड समिती म्हणून कबड्डी करिता प्रदीप मेहर,प्रशांत सरोदे,प्रविण मुरळ, शंकर नाचणे,शालिनी मालवे, मनीषा कवडे.खो खो करिता मनमोहन जामणिक,सुनील सरोदे,सतीश वसु,मेघा खवले.Vollyball करीता विलास मालठाने,मुकुंद झाडे,अब्दुल रहमान.
फुटबॉल  करिता संतोष काळबांडे,किरण गावंडे,मनिष कट्यारमल.क्रिकेट  करिता उमेश सराळे,सोहेल खान,गावंडे.वैयक्तिक स्पर्धा करिता लाला तवाडे,उमेश सराळे,विलास मालठाने,सुनील सरोदे,सुधाकर पांडे. यांनी पंच व निवड समिती म्हणून ब्रम्ही 
बीट अंतर्गत सर्व केंद्रातील खेळाडू व स्पर्धकांची निवड केली. ब्रम्ही बीटचे संयोजक तथा बीट सेक्रेटरी म्हणून  ब्रम्ही चे मुख्याध्यापक
उमेश सराळे यांनी काम पाहले स्पर्धेच्या यशस्वितेकरिता ब्रम्ही केंद्रातील सर्व शिक्षक,शिक्षिका, विद्यार्थी व ब्रम्ही खुर्द च्या गावकरी मंडळींचे सहकार्य लाभले.यानंतर स्पर्धेच्या पुढील वाटचालीचे नियोजन करण्यात आले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post