चार वर्षात मुदखेड-मनमाडचे विधुतीकरण होणार -- महाप्रबंधक यादव



राजेश वालकर
पूर्णा  - येत्या चार वर्षात मुदखेड ते मनमाड या रेल्वे मार्गाचे  दुहेरीकरण व विधुतीकरण होणार असल्याची माहिती  द.म.रे.चे महाप्रबंधक विनोदकुमार यादव यांनी पूर्णेतील पत्रकार व नागरिकांना बोलताना दिलीदक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागाचे परीक्षण करण्यासाठी आलेले यादव यांनी पूर्णा रेल्वे स्थानकाला विशेष गाडीने दुपारी १.१५ ला भेट देऊन पाहणी केली. आपल्या रेल्वेच्या ११ विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह त्यांनी सर्वप्रथम क्रू-बुकिंग लॉबीची पाहणी केली त्यासोबत त्यांनी अत्याधुनिक अपघात चिकित्सा फिरत्या सुविधा गाडीचे उद्घाटन केले. त्यानंतर रेल्वेच्या कॉमुनीटी हाल, वरिष्ठ अभियांत्रिकी विभागाची पाहणी करून तेथील किनवट गँगमेन चे कर्मचारी सोपान रामा यांच्या चांगल्या कामांची प्रशंसा करून पांच हजार रुपयांचा पुरस्कार दिले. त्यानंतर चालक व वाचकांचे विश्राम गृहाची पाहणी केली.यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना यादव यांनी रेल्वे ही सर्वसामान्य जनतेची असून रेल्वेने सर्वसामान्य प्रवासीयांन सुविधा देण्याचे धोरण ठरवले असून मुदखेड ते परभणी दुहेरीकरण चे काम एका वर्षात पुर्ण केले जाणार असून पूर्णा येथील रेल्वे च्या पुलाचे काम प्रगती पथावर असून गोविदपूर जवडील पूल चुडावा च्या बाजूला असलेला सोनखेड येथील नदीवरील पुल पूर्ण झाला आहे. तसेच आगामी चार वर्षात मुदखेड ते मनमाड या दरम्यान रेल्वे चे विधुतीकरण चे काम पूर्ण केले जाणार असून असे त्यांनी सांगितले. यावेळी शहरातील नागरिकांनी उपस्थित केलेल्या डिझेल शेडच्या मागणीला बगल दिली. पूर्णा रेल्वे स्थानकावरील सुरक्षेच्या बाबतीत नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.अपुरी सुरक्षा असल्याने रात्रीच्या वेळी प्रवासीयांचना त्रास सहन करावा लागत आहे.यावेळी विभागीय व्यवस्थपक त्रिकाल रंभा, वाणिज्य विभागाचे रामकृपाल राव, मधुसुदनराव, ए एच फडके, विजय कुमार अग्रवाल, शिवप्रसाद, संजय संस्कृतीयन, पी के शाहू सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post