जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे भारी येथे मेळावा .


जिल्हा,प्रतिनिधि,मक़सूद अली, 
यवतमाळ, दि. 23 : जिल्हा विधीसेवा प्रधिकरण यवतमाळच्या वतीने ग्रामपंचायत भारी येथे भव्य मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश संदीपकुमार मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्या अंतर्गत प्रमुख 21 (शासकीय) कार्यालयाचे स्टॉल लावण्यात आले. त्या स्टॉल अंतर्गत विविध योजनांच्या माहितीची पत्रके, विविध कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या सोईसुविधा आदींबाबत माहिती देण्यात आली. याप्रसंगी भारी येथील तसेच परिसरातील इतर ग्रामपंचायत येथील अंदाजे 1500 लाभार्थ्यांनी सदर मेळाव्याचा लाभ घेतला.यावेळी प्रधानमंत्री आवास योजना, विविध घरकुल योजना, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशनकार्ड, अपंगत्व प्रमाणपत्र, बालकासंबंधीचे अधिकार, बांधकाम कामगारांच्या योजना, अनुसूचित जाती व जमाती योजना, पशुसंवर्धन, कुकुट शेड, शेळीगट, मोटार वाहन कायद्याची माहिती, कृषी विभागाच्या योजना, पंतप्रधान मातृत्व संबंधी योजना, सुकन्या योजना, आरोग्य तपासणी व आरोग्‍य सेवा सुविधा योजना, स्वच्छ भारत अभियान योजना, वरिष्ठ नागरीकांच्या योजना, सामाजिक न्याय विभागाच्या योजना, आदिवासी विभागाच्या योजना, जिल्हा कौशल्य विकास योजना, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण योजना यावेळी या योजनांची माहिती देण्यात आली. सदर मेळाव्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ चे सचिव सु.ना.राजूरकर, कर्मचारी व इतर कार्यालयाचे अधिकारी व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post