![]() |
उमरखेड - इंडोनेशिया येथे पार पडलेल्या तिसरे ' शब्द ' वि३व मराठी साहित्य संमेलनात येथील साहित्यीक प्रा .डॉ . अनिल काळबांडे यांच्या दोन ग्रंथांचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष जेष्ठ गझलकार ए .के . शेख यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी उद्घाटक साम टि .व्ही . संपादक संजय आवटे , डॉ . अनुपमा दे३ाराज , प्रमोद बेलसरे , कल्पना थोरवे, अर्पणा पाटील , संगीता घाग , डॉ . अ . ना .रसन कुटे, लता गुढे , संजना मालप, डॉ . अंजली ठाकरे , गीताजंली जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ . काळबांडे यांचे ' आघ्यशिक्षिका सावित्रीबाई फुले व ' दिनदुबळ्यांचे कैवारी राजश्री शाहु महाराज ' या दोन बाल चरित्र ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले .संजय सिंगलवार शब्द साहित्य मंडळाचे अध्यक्ष यांनी हॉटेल सेन्स सनसेट ( इंडोनेशिया ) येथील सभागृहात शब्द तिसरे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन १२ जानेवारी ते १६ जानेवारी दरम्यान केले होते . यात उदघाटन सोहळ्यात या दोन्ही ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्णा जाधव यांनी तर संचलन ज्योती भगत यांनी केले .या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातून एकुण १५६ लोकांचा सहभाग होता तर यवतमाळ जील्हयातून प्रसिद्ध गाजलकार प्रा .डॉ . सिध्दार्थ भगत , प्रा. ज्योती काळबांडे , डॉ . अजय नरवाडे यांचा सहभाग होता .