![]() |
यवतमाळ: 23 जाने.ला मौलाना आजाद विचार मंच तर्फे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मनिष श्रीगीरीवार यांचा सत्कार करण्यात आला़ त्यांची नियुक्ती येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे झाल्यापासून तेथील स्वच्छतेत व व्यवस्थापनेत आमुलाग्र बदल झालेला दिसून येत आहे़. याची जाणीव जवळपास प्रत्येक रूग्णालयाला भेट देणारे नागरीकांना होत असेल. रूग्णालयातील स्वच्छतेकडे तसेच औषधी पुरवठयाकडे विशेष लक्ष दिल्या जात आहे, तसेच महाविद्यालयाच्या परिसरात सुध्दा निटनिटकेपणा व स्वच्छता, शिस्तपणा जाणवत आहे, त्यांच्या कर्तव्य दक्षतेची जाणीव ठेवून मौलाना आजाद विचार मंच यवतमाळ तर्फे त्यांना पुष्पगुच्छ देवून व स्तुतीसुमनांचा वर्षाव करून सत्कार करण्यात आला़ यावेळी आरएमओ डॉ.चेतन, डॉ. हर्शल तसेच मौलाना आजाद विचार मंच यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अमन निर्बान, शहराध्यक्ष झाकीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष युनुस शेख, जिल्हा उपाध्यक्ष कुणाल आठवले, जिल्हा सचिव अक्रम मवाल, सैयद फारूक, जुनेद शेख, रिजवान शाह, शब्बीर शेख, उस्मान शहा, एजाझउद्दीन काजी, शारीक खान, सावीर खान, तसेच विचार मंचचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते़.