महाराष्ट्राच्या बांधणीसाठी गावागावात सामाजिक सलोखा उभारणार - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले


मुंबई दि.23 - भिमाकोरेगाव प्रकरणातून राज्यात सामाजिक तणाव निर्माण झाला आहे.महाराष्ट्राचे सामाजिक जीवन दुभंगले आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाची पुन्हा नव्याने बांधणी करावी लागेल. त्यासाठी गावागावात सामाजिक  एकता आणि सलोखा स्थापन करणे आवश्यक झाले आहे . भेदभाव मिटवून माणसाला माणूस जोडण्यासाठी ; तुटलेली मने जोडण्यासाठी ; मनामनात एकमेकांप्रती  विश्वास पेरण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षातर्फे प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक सलोखा रॅली आणि सलोखा परिषद आयोजित करण्यात येईल असे  प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. रिपाइंतर्फे चैत्यभूमी पासून नायगाव  स्वातंत्र्यवीर सदाकांत  ढवण मैदान पर्यंत सामाजिक सलोखा रॅली काढण्यात आली. त्या रॅलीचे नायगाव येथे सभेत रूपांतर झाल्यानंतर ना आठवले बोलत होते.विचारमंचावर सौ सीमाताई आठवले कुमार जित आठवले  रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर  महाराष्ट्र अध्यक्ष भुपेश थुलकर राज्य  सरचिटणीस राजा  सरवदे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम सभा अध्यक्ष गौतम सोनवणे स्वागत अध्यक्ष सिद्धार्थ कासारे  काकासाहेब खंबाळकर सुमंतराव गायकवाड अनिल गोंडाने   रिपाइं महिला आघाडीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा आशाताई लांडगे फुलाबाई सोनवणे   सौ शिलाताई गांगुर्डे  अभयाताई सोनवणे रमेश गायकवाड सचिनभाई मोहिते हेमंत सावंत घनश्याम चिरणकर महेंद्र शिर्के पोपतशेठ घनवट बाळासाहेब मिरजे  हनुमंत साठे प्रीतिष जळगावकर सिद्राम ओव्हाळ प्रल्हाद जाधव  आण्णा रोकडे अंकुश गायकवाड बाळकृष्ण इंगळे   देवेंद्र शेलेकर हेमंत रणपिसे  आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.भाषण करून लोकांना भडकविणे  दंगली घडविणे सोपे आहे मात्र तुटलेली मने सांधने कठीण आहे तोडणे सोपे जोडणे अवघड आहे  गावागावात बौद्ध आणि दलित अल्पसंख आहेत त्यांच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे . भेदभावातून संघर्ष दोन्ही समाजाच्या हिताचा नाही .त्यामुळेच सामाजिक सलोख्यासाठी रिपाइंने पुढाकार घेतला आहे.असे ना. रामदास आठवले म्हणाले.  सामाजिक सलोखा रॅलीत हजरो लोक सहभागी झाल्याचे सांगत बहुसंख्य समाज माझ्यासोबत आहे असा दावा ना रामदास आठवलेंनी केला. समाजाचा कौल  घेऊनच मी राजकीय आणि सामाजिक भूमिका घेत असतो त्यामुळेच बहुसंख्य आंबेडकरी समाज माझ्यासोबत आहे.माझा रिपब्लिकन पक्ष देशभर आहे ईशान्य भारतात ही नागालँड मणिपूर आसाम ओरिसा या सहा  देशभरातील 32 राज्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा आणि रिपब्लिकन पक्ष पोहोचविला आहे. निळा झेंडा हाती घेऊन मी एनडीए च्या सरकार मध्ये आहे तोपर्यन्त संविधान आणि आरक्षणाला मी धक्का लागू देणार नाही अशी गर्जना ना रामदास आठवलेंनी केली.अट्रोसिटी चा गैरवापर होऊ नये मात्र अट्रोसिटी कायदा अजिबात बदलणार नाही असे ठणकावून अत्याचार करणाऱ्या माणसाच्या डोक्यातील अत्याचाराचा विचार दूर केला पाहिजे असे सांगत भीमकोरेगाव मध्ये ज्यांनी हल्ला केला त्यांना अटक झाली पाहिजे . हल्ल्याचा कट कोणी रचला त्याचा शोध घ्या  ज्या ग्रामपंचायतींनी ठराव करून बंद पाळला आणि भीमकोरेगाव येथे आलेली आंबेडकरी जनतेची कोंडी केली त्या गावात कोणत्या पक्षाचे सरकार आहे याचा शोध घ्या  असे  ना आठवले यावेळी म्हणाले. शिवाजी महाराजांच्या काळात जातीभेदाच्या नावाने मावळे फुटले असते तर काय झालं असतं? असा सवाल करून शिवरायांच्या मावळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे.भेदभाव विसरून गावागावात सामाजिक एकता सलोखा राखा असे आवाहन ना रामदास आठवलेंनी यावेळी केले.  महाराष्ट्र बंद मध्ये आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी वकिलांनी समाजिक बांधिलकी मानून विनामूल्य  केसेस लढून कार्यकर्त्यांची सुटका केली . त्याबद्दल ना आठवलेंनी वकिलांचे कौतुक केले. महाराष्ट्र बंद मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा सहभाग घेतला होता . प्रकाश आंबेडकरांनी  महाराष्ट्र बंद जाहीर केला नसता तरी बंद यशस्वी झाला असता .त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र बंद यशस्वी झाला नाही.   आमचा एकच राजा भीमराव माझा !  डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे एकमेव राजे आहेत. असे ना आठवले म्हणले. आपण कागदी वाघ नसून खतरनाक ढाण्यावाघ आहे असे ना रामदास आठवले म्हणाले.


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post