![]() |
साजिद पतलेवाले
दिग्रस:-स्थानिक बारी समाज संघटनेची नवीन कार्यकारिणी दि.१८ जानेवारी रोजी मरीआई संस्थान येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी समाज बांधवांनी सर्वानुमते अध्यक्ष म्हणून डॉ.संदीप दुधे तर सचिव सुरेश चिरडे यांची अविरोध निवड केली.तसेच सर्वानुमते अविरोध निवडीत उपाध्यक्ष सुरेंद्र चिरडे,कोषाध्यक्ष योगेश दुधे, सहसचिव दीपक माहुरकर सह सर्व सदस्यांची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीच्या निवडीत सर्व समाजबांधवांनी सहकार्य केले.या झालेल्या निवडीबद्दल सर्वस्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.