![]() |
साजिद पतलेवाले
दिग्रस - शेतकरी बांधवांमधील कृषी धर्म जागृत करण्यासाठी विश्व हिंदु परिषदे कडून १६ जानेवारीला सिंधखेड राजा येथून निघालेली शेतकरी जागरण यात्रा हि आज मंगळवार,२३ जानेवारीला सकाळी ८|३० वाजता दिग्रसला पोहोचणार आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या प्रांगणात शेतकरी जागरण यात्रेमध्ये जैविक शेती करणारे शेतकरी बंधू यांचे जैविक शेतीविषयक अनुभव व मार्गदर्शन राहणार आहे. सध्या शेतात घातक विषारी रसायनांचा वापर अधिक वाढला आहे. किटकणाशकाच्या अति फवारणीमुळे जैविक तंत्र बिघडले आहे. गोवंशाचा वापर फक्त दुध आणि मांस यासाठीच झालेला आहे. शेतकरी या आत्मघाती धोरणांना बळी पडलेला परिणाम म्हणून आत्महत्या,गोहत्या,दुषित अन्न धान्य खाल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. यासाठी हि शेतकरी जागरण यात्रा काढण्यात आली असल्याची माहिती विश्व हिंदु परिषद पुसद जिल्ह्याचे महामंत्री बालाजी कामिनवार, सदस्य अभय इंगळे, तालूका संघप्रमुख दत्तात्रय बनगीनवार, कपिला गौरक्षण प्रमुख मनोज सरवैय्या, नगर कार्यवाह वसंत खोडके, दिनेश शिंदे, बजरंग दलाचे गणेश ढाले, अनुप लाचूरे , शुभम देशमुख, मनिष खोडे व लोकेश शुक्ला आदींनी दिली आहे.