![]() |
प्रवीण वैष्णव
तेल्हारा :- तेल्हारा पालिकेचे विरोधीपक्ष नेते मितेश मल्ल यांनी प्रहार जनशक्ती पक्षात आ.बच्चू कडू यांच्या उपस्तिथीत प्रवेश केल्याने त्यांच्या कडे तेल्हाराशहर अध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली.तेल्हारा न प निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले मितेश मल्ल हे विरोधी पक्षनेते पदी विराजमान झाले.न प विरोधीपक्ष नेता पदाची धुरा सांभाळत असताना आ बचुभाऊ कडु याच्या वर विश्वास ठेवून त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला .यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांनी मितेश मल्ल यांची तेल्हारा शहर अध्यक्ष पदि नियुक्ती केली.यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख राजेश खारोडे,शेतकरी आघाडीचे लक्ष्मण इंगळे यांच्या सह प्रहार जनशक्ती पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या प्रवेशाने प्रहार मध्ये नवचैतन्य निमार्ण झाले असुन त्यांच्या पक्ष प्रवेश व शहर अध्यक्ष पदी निवड झाल्याने प्रहारच्या कार्यकर्त्यांनमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे त्यांच्या या प्रवेशाने न.प.च्या राजकारणावर फरक पडणार आहे. प्रहारचे अध्यक्ष पद मिळाल्याने व न.प.चे विरोधी पक्ष नेते असल्याने मितेश मल्ल पालिकेच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी सक्षम पने प्रहार करण्याची शक्यता नाकारता येत नाही (जनसामान्यांचे नेते आ.बंचू भाऊ कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी प्रहार मंध्ये प्रवेश केला त्याच्या विश्वासाला तळा न जाऊ देता समाजकार्य करणार आहे मितेश मल्ल अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष तेल्हारा शहर .