अकोला
शेतकरी , ग्राहक , ठेविदार , भागदारक व बॅंकेचे हितचिंतकाच्या विश्वावासामुळे अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शेतकरी सेवेच्या ११० व्या वर्षत पदार्पण करीत असताना अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची भारतातील उत्कृष्ट जिल्हा सहकारी बॅंक म्हणुन निवड करण्यात आलेली आहे . राष्ट्रीय स्तरावरिल इनमा या आर्थिक सर्वेक्षण संस्थेने बॅंको राष्ट्रीय पुरस्कार* देउन सन्मानित केले आहे . आधुनिक तंत्रज्ञानाच्या पायऱ्या चढत असताना बॅंकेच्या सन्मानात बॅंको पुरस्कारने आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. हेद्रबाद येथे झालेल्या शानदार समारंभात तेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री मो महेमुद अली आय .डि. आर. बी. टी. चे संचालक डोक्टर ए एस रामासास्त्री तसेच N.A F.C.U.B.नवीदिल्ली चे संचालक रमेश कुमार बंग यांच्या हस्ते बॅंको पुरस्कार अकोला जिल्हा बॅंकेस प्रदान करण्यात आला . या प्रसंगी बॅंकेचे वतीने जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य , कर्जे व देखरेख विभागाचे व्यवस्थापक प्रभुदास शेंडे, व हिशेब व बंकिंग विभागाचे व्यवस्थापक शिवप्रसाद मोहोड यांनी हा पुरस्कार स्विकारल इनमा या राष्ट्रीय आर्थिक संथेने सर्वेक्षण १० ज्युरी च्या मार्गदर्शनात देशभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा सर्वांगीण अभ्यास करुन बॅंको पुरस्काराकरीता अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बंकेेचे उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक म्हणून निवड केली .
![]() |
भारतातील उत्कृष्ट जिल्हा सहकारी बॅंक म्हणून इनमा चा बंको राष्ट्रीय पुरस्कार |