![]() |
प्रवीण वैष्णव
तेल्हारा :- एक वर्षापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या श्री शिवाजी महाराज प्रवेश द्वारा सह इतर सर्व कामे मार्गी लावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष मिथेश मल्ल यांच्या नेतृत्वात तेल्हारा नगर पालिकेचे मुख्यधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली श्री शिवाजी महाराज महाराज प्रवेश द्वार बांधकाम श्री शिवाजी महाराज पुतड्या जवळील सौंदरीकरण विरंगुळा केंद्र बांधकाम करणे मुस्लिम समाजा साठी शदिखाना बांधकाम मिलिंद नगर मधील बुद्धविहार बांधकाम इत्यादी लाखो रुपयांची कामे निविदा प्रक्रिया होऊन एक वर्ष पूर्वी पूर्ण झाली परंतु अध्याप परेंत सदर कामे पालिकेने पूर्ण केली नाही त्यामुळे शहराचा विकास थांबला आहे सदर कामे सुरू करण्यास पालिकेने विनाकारण विलंब केल्यास प्रहार आंदोलन छेडणार असा इशाराही देण्यात आला पालिकेला देण्यात आलेल्या निवेदनावर प्रहार जनशक्ती पशाचे शहर अध्यक्ष मितेश मल्ल शिवा खारोडे अनिकेत बकाल शुभम तायडे भय्या देशमुख वैभव खाडे धीरज लोणकर वैभव ढोले रोशन अहेरकर मुन्ना कळू रवी ताथोड इत्यादी प्रहरच्या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या स्वाक्षऱ्या आहेत.