![]() |
ताहेर मिर्ज़ा
उमरखेड - मानसाची सर्वात मोठी समस्या अन्नपाणी नाही तर शांती आहे .आज मनालाशांती मिळत नाही.
याच कारण माणुस आत्मभान विसरला आहे .मी कोण, मला जीवन कशा करिता मिळाले,माझ्या जीवनाचा
उद्देश काय याचे उत्तर नसल्यामुळे आज मानसीक शांती नाही,कौटुंबिक शांती पण विस्कळीत झाली घरच्यांचा घरवाल्यावरील विश्वास उडाला आहे .
सामाजीक शांती जेवढी माणस भारत पाक - चीन युध्दात दोन्हीकडील मारली गेली
त्यापेक्षा जास्त दंगलीत मारली गेली .दंगलीत कोणता मौलाना,पादरी, पंडीत मारहान किंवा जाळपोळ करतांना कधीच दिसणार नाही .हे सर्व समाज कंटकाकडून
होते धर्मामुळे नाही धर्म अमृत आहे विष नाही. प्रगती म्हणजे सर्वकश प्रगती आर्थीक, आध्यात्मीक , नैतीक प्रगती होय .जाब देण्याची
भावना आणि चांगले कर्म यामुळे मुक्ती प्राप्त होते .आणी हीच भावना शांतता
प्रस्तापित करते . आणी शांतता असली तरच प्रगती - विकास होऊ शकते असे मत
शाहिस्ताखान यांनी व्यक्त केले त्या जमाते
इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे शांती प्रगती आणि मुक्तीसाठी इस्लाम याराज्यव्यापी
आभियाना अंतर्गत धात्रक निवास शिक्षक कॉलनीत घेण्यात आलेल्या महीलांच्या सभेत बोलत
होत्या .याप्रसंगी
ट्रीपल तलाक वर चर्चा करण्यात आली यासंबंधी सविस्तर माहिती इस्लामी तत्वेज्ञा
शिरीन तबस्सुम यांनी दिली . शमीम खान यांनी महिलांच्या जवाबदाऱ्या विषयी सविस्तर
मांडणी केली .डॉ . वंदना
वानखेडे यांनी मनुवादापासून सावध रहा, जातीभेदापासून दुर रहा असे आवाहन करत मुस्लीम आपले शत्रू नाहीत असे सांगत
महिलांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेत मुलांच्या प्रशिक्षणावर भर देण्याची गरज
असल्याचे सांगीतले .सुत्रसंचलन
नुसरत खान तर आभार प्रदर्शन हुमेरा काझी यांनी केले . सर्वसमाज समावेशक अशा
या कार्यक्रमात असंख्य माहिला भगिनीउपस्थित होत्या .